न्यूझीलंडचा ब्रेंडन मैकुलम 'या' IPL संघाचा सहाय्यक प्रशिक्षक बनण्याच्या तयारीत, एकेकाळी याच टीमसाठी पाडला होता चौकार आणि षटकारांचा पाऊस
ब्रेंडन मैकुलम (Photo Credit: @bazmccullum42/Instagram)

न्यूझीलंड (New Zealand) संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मैकुलम (Brendon McCullum) याने सर्व मागील आठवड्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो जगभरात होणार्‍या टी-20 लीगमध्ये खेळत होता. मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangaluru) संघाने आयपीएल (IPL) च्या लिलावापूर्वी त्याचा सोबतचा करार संपवला होता. शिवाय त्याला लिलावातदेखील कोणतेही खरेदीदार मिळाले नाहीत. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचे पुनरागमन होऊ शकते. मैकुलम कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात परतू शकतो. पण यावेळी तो प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. ईएसपीएनच्या अहवालानुसार मैकुलम दोन वेळा आयपीएल विजेता केकेआरचा सहाय्यक प्रशिक्षकाच्या पदभार स्वीकारू शकतो.

कोलकाताच्या टीमने त्याच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून करार केला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, नुकतीच सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झालेला मैकुलम कॅरेबियन प्रीमियर लीगच्या संघात त्रिनिदाद नाइटरायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सहभागी होईल. विशेष म्हणजे या दोन्ही संघात तो सायमन कॅटिच यांची जागा घेईल. हे दोन्ही संघ बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या मालकीचे आहेत आणि म्हणूनच त्याला ही जबाबदारी मिळू शकते.

आयपीएलच्या सुरुवाती सत्रात मैकुलम कोलकाता संघासाठी खेळात होता. त्याने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 158 धावांची तुफानी खेळी केली होती. तो पाच हंगामात केकेआर संघाचा सदस्य होता आणि 2000 मध्ये त्यांनी संघाचे नेतृत्वही केले. केकेआरनंतर तो कोची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपर किंग, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. कोलकाता संघाने काही दिवसापूर्वी आधी मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस आणि सहायक प्रशिक्षक सायमन कॅटिच यांच्याशी करार रद्द केला होता.