Dadi Hriday Mohini | (Photo Credits: Twitter/ @VPSecretariat)

प्रजापिता ब्रह्माकुमारी (Brahma Kumaris) इश्वरीय विद्यापीठाच्या प्रमुख राजयोगिनी दीदी हृदयमोहिनी (Dadi Hriday Mohini) यांचे निधन झाले आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. मुंबई येथील सैफी हॉस्पिटल येथे त्यांनी गुरुवारी (11 मार्च) रात्री अखेरचा श्वास घेतला(Brahma Kumaris Chief Dadi Hriday Mohini Passes Away) . एअर अॅब्युलन्सने त्यांचे पार्थीव ब्रह्माकुमारी येथील आबू रोड स्थित आंतरराष्ट्रीय मख्यालय शांतिवन येथे आणण्यात आले. दादी हृदयमोहिनी यांच्या निधनामुळे ब्रह्माकुमारी परीवार आणि एकूणच अध्यात्मीक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

आज (12 मार्च) त्यांचे पार्थी अंतिम दर्शनासाठी शांतिवन येथे ठेवण्यात येईल. 13 मार्चला सकाळी माऊंट आबू येथील ज्ञान सरोवर आकादमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. दीदीच्या निधनावर छत्तीसगडचे राज्यपाल अनुसुइया उइके आणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ब्रह्माकुमारीच्या माहिती निदेशक बी के करुणा यांनी सांगितले की, राजयोगिनी दीदी हृदय मोहिनी जी यांना काही दिवसांपासून प्रकृतीअस्वास्थ्य जाणवत होते. त्यामुळे त्यांना मुंबई येथील सैफी हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच भारतासह जगभरातील 140 देशांमध्ये कार्यरत असलेल्या सेवा केंद्रांवर शोककळा पसरली. एक वर्षापूर्वी दादी जानके यांचे निधन झाले होते. त्यानंतर हृदयमोहिनी यांना ब्रह्माकुमारीचे प्रमुख प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.