Amazon (PCc - Pixabay)

ई-कॉमर्स दिग्गज कंपनी ( e-commerce compeny) अ‍ॅमेझॉन (Amazon) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनी आपल्या वेबसाईटवरुन राधा-कृष्णाची 'अश्लील' चित्रे (Radha-Krishna Painting) विकत असल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने शुक्रवारी केला. त्यानंतर अ‍ॅमेझॉन विरोधात तक्रार दाखल झाली असून, सोशल मीडियात (Social Media) बॉयकॉट अ‍ॅमेझॉन (Boycott Amazon) असा ट्रेण्डही चालवला जातो आहे. दरम्यान, एका संघटनेकडून अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर कारवाई करण्याची विनंती करणारे निवेदन बेंगळुरूमधील सुब्रमण्य नगर पोलीस स्टेशनला सादर करण्यात आल्याचे समजते.

हिंदू संघटनेने दावा केला आहे की, समाजातून जोरदार प्रतिक्रिया आल्यानंतर अ‍ॅमेझॉनने आपल्या साईटवरुन 'ती' वादग्रस्त चित्रे हटवली आहेत. "परंतु हे पुरेसे नाही. Amazon आणि Exotic India या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि पुन्हा कधीही हिंदूंच्या भावना दुखावणार नाही याची शपथ घेतली पाहिजे," असे ट्विट या संघटनेने केले आहे. दरम्यान, अॅमेझॉनने या वादावर अद्याप कोणतीही प्रितक्रिया दिलेली नाही. हे पेंटिंग एक्झोटिक इंडियाच्या वेबसाइटवरही उपलब्ध होते, असा दावा संस्थेने केला आहे. 18 आणि 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्या दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Amazon Great Freedom Festival: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळवा 80 टक्क्यांपर्यत सूट, अॅमेझॉनचा स्वतंत्र्यदिना निमित्त विशेष सेल)

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने राधा आणि कृष्णाच्या 'अश्लील' चित्रांची विक्री करत असल्याचे हिंदु जनजागृती समितीने शुक्रवारी सांगितल्यानंतर ट्विटर वापरकर्त्यांनी #Boycott_Amazon हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली. संस्थेच्या म्हणण्यानुसार, जन्माष्टमी सेल अंतर्गत एक्झॉटिक इंडियाने त्यांच्या वेबसाइटवर हीच पेंटिंग विकली होती. जी आम्ही अश्लील मानतो.