Blood Donation After COVID Vaccination: भारतामध्ये कोविड 19  लसीकरणानंतर रक्तदान करण्याचा कालावधी 28 दिवसांवरून 14 दिवसांवर
Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आता कोविड 19 लस दिल्याणंतर रक्तदान करू शकण्याचा कालावधी 28 दिवसांवरून 14 दिवसांवर करण्यात आला आहे. यापूर्वी National Blood Transfusion council ने दिलेल्या माहितीनुसार 5 मार्च 2021 च्या नोटिफिकेशनमध्ये कोविड 19 ची लस घेतल्यांतर संबंधित व्यक्ती28 दिवसांनी रक्तदान करू शकतो असे सांगितले होते पण आता यामध्ये National Blood Transfusion council च्या तज्ञांकडून पुन्हा आढावा घेत गाईडलाईनमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. असे TOI चे वृत्त आहे.

भारतामध्ये आता 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. हाच तरूण वर्ग रक्तदान देखील मोठ्या प्रमाणात करत असतो. अशावेळी जर लसीकरणानंतर 28 दिवस रक्तदानासाठी थांबावं लागत असेल तर रक्ताचा तुटवडा देखील भासण्याची शक्यता आहे. हीच भीती ओळखून आता रक्तदानासाठी कालमर्यादेची पुन्हा तज्ञांकडून माहिती घेण्यात आली आहे आणि आता हा कालावधी 14 दिवसांपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही वॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी तुम्ही रक्तदान करू शकता असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान सध्या भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मध्ये 28 दिवस ते 4-6 आठवड्यांचा कालावधी आहे. तर कोवॅक्सिन 42 दिवसांच्या फरकाने घेतली जाऊ शकते असे सूचवण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही व्हॅक्सिन घेणार असाल तर रक्तदानाचं गणित देखील त्याच्या गणितावरच करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतामध्ये हा रक्तदानासाठी कालावधी सर्वाधिक होता. अमेरिकेत mRNA लसींसाठी अमेरिकन रेड क्रॉस ने 14 दिवसांचा कालावधी ठेवला आहे. तर युके मध्ये Oxford vaccine (Covishield)नंतर 7 दिवसांत रक्तदान केले जाऊ शकते. भारतामध्ये सध्या रक्तदानासोबतच प्लाझ्मा दान करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.