Sunny Deol Tests Positive for COVID-19: अभिनेते, खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण
सनी देओल (Photo Credits: Instagram)

भाजपा खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल (BJP MP Sunny Deol)यांना कोरोना वायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. हिमाचल मधील कुल्लू जिल्ह्यामध्ये त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सनी देओल यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटीन करून घेतले आहे. तसेच ते कोविड 19 च्या गाईडलाईनचे पालन करत आहेत. 64 वर्षीय सनी यांच्यावर नुकतीच मुंबईमध्ये खांद्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे आणि आरामासाठी ते मनालीमध्ये फार्महाऊसवर आले होते. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवुड अभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्याकडून 50 लाखांची आर्थिक मदत.

सनी देओल हे गुरदासपूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. सप्टेंबर महिन्यात ते गुरदासपूर मध्ये पोहचले होते. तेथे त्यांनी कोविड 19 च्या संकटाचा आढावा घेतला. अन्य काही मुद्द्यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा देखील केली. यावेळेस ते स्वतः लोकांमध्ये कोविड 19 बाबत सजगता पसरवण्यासाठी देखील काम करत होते.

ANI Tweet

सनी देओल अंदाजे 6 महिन्यांनंतर गुरदासपूरमध्ये दाखल झाले होते असे देखील सांगितले जाते. तेथे भेट दिल्यानंतर ट्वीट करत 'कोरोना बद्दल लोकांना जागृत करण्यासाठी आणि गुरदासपूर मधील कायदा व प्रशासन व्यवस्था याबाबत एसएसपी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सनी देओलबद्दल सातत्याने एक तक्रारीचा सूर ऐकू येतो. यामध्ये ते खासदार बनल्यानंतर आपल्या मतदारसंघात फारसे फिरकले नसल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या विरूद्धचा राग व्यक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्या नावाचे मिसिंग पोस्टर्स देखील पहायला मिळाले आहेत.