देशात कोरोनाग्रस्त (Coronavrius) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सध्या 600 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीला अनेक जण धावून येत आहेत. अनेक दिग्गज नेते तसेच कलाकारांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली आहे. अशातचं बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) यांनी त्यांच्या गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातील जनतेसाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
सनी देओल यांनी खासदार निधीतून ही रक्कम दिली आहे. त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसचा सामना करताना माझ्या लोकसभा मतदार संघातील गुरुदासपूर आरोग्य विभागाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी मी खासदार निधीतून 50 लाखांची मदत करत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय गुरुदासपूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असंही म्हटलं आहे. (हेही वाचा - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी गौतम गंभीर यांचा मदतीचा हात; खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास देणार 50 लाख रुपयांचा निधी)
करोना जैसी महामारी के बचाव के लिए अपनी लोकसभा गुरदासपुर के सेहत विभाग को किसी भी तरह की दिक्कत का सामना ना करना पड़े इसलिए मैं अपने एमपी लैंड से ₹5000000 का फंड रिलीज करता हूं ताकि अपना हलका गुरदासपुर को इस महामारी से निपटने में किसी दिक्कत का सामना ना करना पड़े
— Sunny Deol (@iamsunnydeol) March 25, 2020
यापूर्वी भाजप खासदार गौतम गंभीर यांनीदेखील खासदार निधीतून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी 50 लाख रुपयांची मदत केली होती. सध्या भारतात कोरोनाचे सावट पसरले असताना अनेक दिग्गज कलाकांराकडून कोरोना संदर्भात जनजागृती केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडू नका, असं आवाहन कलाकारांकडून केलं जात आहे.