भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची लोकसभा प्रोटॅम स्पीकर पदी नेमणूक, 17 व 18 जूनला नवनिर्वाचित खासदारांना देणार शपथ
Dr. virendra Kumar Appointed As protem Speaker Of lok Sabha (Photo Credits: File Photo)

नवी दिल्ली: देशातील 17 व्या लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Elections)  सोहळा मोदी सरकारच्या अभूतपूर्व विजयाने संपन्न झाला. 30 मे ला नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तसेच यानंतर खातेवाटप प्रक्रिया पार पडली. यापाठोपाठ आज भाजपाचे डॉ. वीरेंद्र कुमार (Dr. Virendra Kumar) यांची लोकसभा प्रोटॅम स्पीकर (Protem Speaker)  पदी नेमणूक करण्यात आली आहे. देशभरातून निवडून आलेल्या सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा येत्या 17 व 18 जूनला पार पडणार असून यामध्ये डॉ. कुमार हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणार आहेत.

लोकसभा निकालानंतर नव्या मंत्रिमंडळाचे पहिले अधिवेशन 17 जून ते 26 जुलै या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये अर्थसंकल्पचे निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच सुरवातीचे दोन दिवस म्हणजेच 17 व 18 जून दरम्यान नवीन खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडेल. Modi Cabinet 2019 खाते वाटप जाहीर; अमित शहा गृहमंत्री तर निर्मला सीतारामण अर्थमंत्री

ANI ट्विट

यंदा बनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारच्या मंत्री मंडळात अनेक ख्यातनाम चेहऱ्यांना स्थान मिळाले नव्हते यामध्ये मनेका गांधी यांच्या नावाचा देखेल समावेश होता. त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने निदान लोकसभा स्पीकर पदासाठी तरी त्यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा होती. मात्र या चर्चांना विराम लागून डॉ. वीरेंद्र कुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत डॉ. कुमार हे मध्यप्रदेश मधील टिकमगढ येथून निवडून आले आहेत तर मागील सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते.