अहमदाबाद : निवडणूक काळात जनता आमची मायबाप असे म्हणणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर याच जनतेला आपलं गुलाम मानायला लावतात अशी अनेक उदाहरणं आपण आजवर ऐकली आहेत. असाच काहीसा प्रकार गुजरात (Gujrat) मधील बलराम थवानी (Balram Thawani) या भाजपा आमदाराच्या वागणुकीत दिसून आला. काहीश्या वादावरून बलराम हे नीतू तेजवानी (Neetu Tejwani) नामक एका महिलेला भर रस्त्यात चक्क लाथा बुक्क्यांनी मारत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये बलराम ज्या महिलेला मारत आहेत ती राष्ट्रवादीची कार्यकर्ती असल्याचं म्हंटलं जातंय.
नीतू तेजवानी या राष्ट्रवादीच्या वॉर्ड अधिकारी असून मागील आठवड्यात त्यांनी बलराम यांच्या कुबेरनगर येथील कार्यलयात जाऊन भेट घेतली होती,या भेटीत त्यांनी बलराम यांना परिसरातील घरे आणि कार्यलयाच्या कापलेल्या नळजोडण्या पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवसाचा अवधी देत तसे न झाल्यास कार्यालयासमोर आंदोला करू असा इशारा दिला होता. दोन दिवसांनंतर नीतू व स्थानिक नगरसेवक किशोर हे नळजोडणीची पाहणी करण्यासाठी माया सिनेमा जिवाच्या परिसरात गेला होता. त्याच वेळी हा प्रसंग घडला. या मारहाणी दरम्यान बलराम हे नीतू यांना लाथा मारत असताना त्यांचा एक कार्यकर्ता महिलेच्या कानाखाली मारत होता तर अन्य काही कार्यकर्ते हे नीतू यांचे पती राजेश तेजवानी यांना मारहाण करत होते. यावेळी व्हिडीओ काढणाऱ्या एका व्यक्तीला किशोर यांनी धक्का दिल्याचे देखील दिसत आहे.
(Watch Video)
याबाबत माहिती देताना नीतू तेजवानी सांगतात की "नळजोडण्या देण्यासाठी बलराम यांना दोन दिवसांची मुदत दिली. पण थवानी आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला तेथून जबरदस्तीनं हटवण्यास सुरुवात केली. आम्हाला मारहाण केली. काही जण हॉकी स्टिक घेऊन आले. आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली," तर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कोणालाही मारहाण करण्याचा आपला उद्देश नव्हता असे म्हणत बलराम यांनी सारवासारव करायला सुरवात केली. आपल्यला कोणीतरी मागून मारत असल्याने स्वसंरक्षणासाठी आपण लाथ मारली आणि ती नजरभुलीने नीतू यांना लागली असे देखील बलराम यांनी म्हंटले आहे.Video: बायकोला माराहण कशी करावी? कतार येथील व्यक्तिकडून YouTube वर प्रशिक्षणाचा व्हिडिओ पोस्ट
बलराम यांच्या मारहाणीचा व्हिडीओ आम्ही वृत्तवाहिन्यांवर पाहिला आणि आता आमच्याकडे या प्रकरणी अधिकृत तक्रार आली आहे,' अशी माहिती झोन 4 चे पोलीस उपायुक्त नीरज बडगुजर यांनी दिली.