गुजरात BJP आमदाराने आधी लाथा मारलेल्या महिलेकडून बांधून घेतली राखी
Balram Thawani gets Rakhi Tied By The Women He Has Beaten Earlier (Photo Credits: File Photo)

अहमदाबाद: गुजरात (Gujrat)  मधील भाजपा पक्षाचे (BJP MLA) आमदार बलराम थवानी (Balram Thwani) यांच्या महिलेला मारहाण करत असल्याच्या व्हायरल व्हिडीओवरून सोशल मीडियावर खबल उडाली होती. मात्र आता काहीसे भलतेच चित्र समोर येत आहे. बलराम यांनी ज्या महिलेला काही वेळापूर्वी लाथा मारल्या त्या महिलेकडून चक्क राखी बांधून घेत असल्याचे फोट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नीतू तेजवानी (Neetu Tejvani)  या राष्ट्रवादी पक्षाच्या वॉर्ड अधिकारी महिलेला आज सकाळी बलराम व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. मात्र Economic टाइम्सच्या वृत्तानुसार आता आमच्यातला वाद संपला असून नीतू या आज पासून माझी बहीण असून मी घडलेल्या प्रकारासाठी त्यांची माफी मागीतल्याचे बलराम यांनी म्हंटले आहे. तर या व्हायरल फोटो मध्ये नीतू या देखील हसताना दिसत असल्यामुळे हा वाद खरंच मिटला असल्याचे वाटत आहे.

गुजरात मध्ये BJP आमदाराची गुंडशाही, भर रस्त्यात महिलेला लाथा बुक्क्यांनी केली मारहाण (Watch Video)

मारहाण करतानाचा व्हिडीओ

रक्षाबंधनाचे ट्विट

नीतू तेजवानी या बलराम यांच्या स्थानिक कार्यलयात आज सकाळी नळजोडणी व पाण्याच्या समस्या घेऊन आपला नगरसेवक भाऊ व पतीसोबत गेल्या होत्या. त्यावेळी बलराम यांच्या कार्यलयासमोर धरणा देऊन बसू असा इशारा देखील त्यांनी केला होता यावरून उठलेल्या वादात कार्यकर्त्यांनी तेजवानी दाम्पत्याला मारहाण केली होती. युवा व्हायरल व्हिडीओ मध्ये बलराम हे नीतू यांना चक्क लाथा घालताना पाहायला मिळाले होती मात्र आता हे अनोखे रक्षाबंधन करून त्यांनी आपल्यातील वाद मिटल्याचे सांगितले आहे.