
BJP Leader Surendra Jawahra Shot Dead: हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात जमिनीच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष सुरेंद्र जवाहर (BJP Leader Surendra Jawahra) यांना दुकानात पाठलाग करून शेजारच्या एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. जमिनीच्या वादातून झालेल्या या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. हल्लेखोराने सुरेंद्र जवाहर यांच्यावर एकामागून एक तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हा परिसरातील रहिवासी असून त्याचा भाजप नेत्याशी जुना जमिनीचा वाद होता. असे म्हटले जाते की भाजप नेत्याने त्याच्या शेजाऱ्याच्या मावशीची जमीन खरेदी केली होती, ज्यावरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री हल्लेखोराने भाजप नेत्याच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक जवाहर यांच्या डोक्यात आणि दुसरी पोटात लागली. (BJP leader Pramod Yadav Shot Dead: भाजप नेते प्रमोद यादव यांची जौनपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या; धनंजय सिंह यांच्या पत्नीविरोधात निवडणूक लढण्याची केली होती घोषणा)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात. त्यानंतर जवाहर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (BJP Leader Shot Dead: मुरादाबादमध्ये भाजप नेत्याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद, Watch Video)
#Sonipat भाजपा के मुंडलाना मंडल अध्यक्ष सुरेंद्र जवाहरा की गोली मारकर हत्या गांव जवाहरा में पड़ोसी ने गोली मारकर हत्या की.#CCTV@BJP4Haryana @NayabSainiBJP pic.twitter.com/I9TT9eZpZO
— Anuj Tomar (journalist) (@THAKURANUJTOMAR) March 15, 2025
प्राप्त माहितीनुसार, जमिनीवरून भाजप नेते आणि आरोपींमध्ये अनेक वेळा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी भाजप नेते जमिनीवर बी पेरण्यासाठी गेले असता, आरोपीही तिथे पोहोचले आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. वादानंतर जवाहर तिथून परत गेला. दरम्यान, तो त्याच्या दुकानात बसला असताना आरोपीने त्याला लक्ष्य करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर जवाहरवर हल्ला करताना दिसत आहे.