
BJP leader Pramod Yadav Shot Dead: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील बोधापूर गावात राहणारे भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद यादव (Pramod Yadav) (वय, 55) यांची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. सध्या ते भाजप संघटनेचे जिल्हा सरचिटणीस होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रमोद यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकी सोडून पळ काढला. प्रमोद यांचा जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीची दुचाकी ताब्यात घेतली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अजय पाल शर्माही घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक लोक आणि कुटुंबीयांची चौकशी करून सर्व पैलू तपासले जात आहेत. (हेही वाचा - EC Advisory to Rahul Gandhi: पंतप्रधानावरील वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांना सल्लागार जारी, भविष्यात अधिक सावध राहण्याचा दिला सल्ला)
प्रमोद यादव हे भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष होते. याआधी 2012 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर मल्हाणी येथून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भाजप नेत्यांचा जमाव जमला. लोकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. (वाचा - Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार)
तथापी, प्रमोद यादव यांचे वडील राजबली यादव यांचीही 1980 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते जनसंघाशी संबंधित होते. त्यांनी एकदा जनसंघाच्या तिकिटावर रारी विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.