BJP Leader Shot Dead (PC - Twitter/@Benarasiyaa)

BJP Leader Shot Dead: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्याची गुरुवारी त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. अनुज चौधरी (Anuj Chaudhary) असं मृत भाजप नेत्याचं नाव आहे. अनुज चौधरी हे राजकारणात सक्रिय होते. गुरुवारी संध्याकाळी मुरादाबाद येथील त्यांच्या घराबाहेर ही घटना घडली. हत्येमागे राजकीय वैमनस्य आणि भाजप नेत्यावरील हल्ल्यामागचा हेतू संशयास्पद आहे, असे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास केल्यानंतर सांगितले.

अनुज चौधरी हे मुरादाबाद येथील त्याच्या घराबाहेर चालत होते. यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या भाजप नेत्यावर गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हेही वाचा - Nuh Violence: नुह हिंसाचार प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई, 365 जणांना अटक, 153 FIR दाखल; गृहमंत्र्यांनी जाहीर केला अहवाल)

घटना घडली तेव्हा चौधरी हे अन्य एका व्यक्तीसोबत होते. त्यांच्यावर गोळी झाडल्यानंतर चौधरी यांना तातडीने मुरादाबादच्या ब्राइटस्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मुरादाबादचे एसएसपी हेमराज मीना यांनी सांगितले की, अनुज चौधरी नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीवर अज्ञात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. अनुज चौधरीला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चौधरी यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चौधरी आणि अनिकेत या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.