Close
Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

MP ByPoll Results 2020 Live: 28 पैकी 12 जागांवर भाजप विजयी, काँग्रेसला एका जागेवर विजय

बातम्या अण्णासाहेब चवरे | Nov 10, 2020 08:28 PM IST
A+
A-
10 Nov, 20:28 (IST)

मध्य प्रदेश राज्यात भाजपने आतापर्यंत 28 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. यात 6 मंत्र्यांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय या मंत्र्यांची नावे अशी अनूपपुर येथून येथून बिसाहूलाल सिंह, बदनावर येथून राजवर्धन सिंह दत्तीगांव, बमोरी येथून महेंद्र सिंह सिसौदिया, सांची येथून प्रभुराम चौधरी, ग्वालियर येथून प्रद्यु्म्न सिंह तोमर आणि सुवासरा येथून हरदीप सिंह डंग विजयी झाले आहेत. काँग्रेसला अद्याप केवळ एक जागा मिळाली आहे.

10 Nov, 20:09 (IST)

ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन जनादेश नाकारणे ही कॉंग्रेसची सवय बनली आहे. जर त्यांनी असेच केले तर ते जेथे असतील तेथेच राहतील किंवा आणखी वाईट स्थितीत राहतील- ज्योतिरादित्य सिंधिया

10 Nov, 18:41 (IST)

मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत 19 जिल्ह्यांतील 28 मतदारसंघातील 76% मतमोजणी पूर्ण झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 34.11 लाख मतं मोजली गेली.

10 Nov, 18:39 (IST)

मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत 44 लाख मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 34 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत 50% मतदारांनी भाजपला मतदान केल्याचे आकडेवारी सांगते.

10 Nov, 18:34 (IST)

डबरा मतदारसंघातून इमरती देवी 4376 मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेस पक्षाचे सुरेशराजे यांच्या त्या प्रतिस्पर्धी आहेत. इमारती देवी कमलनाथ यांनी केलेल्या 'आयटम' विधानामुळे चर्चेत आल्या होत्या.

10 Nov, 18:09 (IST)

हाटपिपलिया मतदारसंघातही कमळ फुलले आहे. या ठिकाणी भाजपचे मनोज चौधरी वियजी झाले आहेत.

10 Nov, 18:09 (IST)
हाटपिपलिया मतदारसंघातही कमळ फुलले आहे. या ठिकाणी भाजपचे मनोज चौधरी वियजी झाले आहेत.
10 Nov, 17:22 (IST)

 

शिवराज सिंह सरकारमधील तीन मंत्री पिछाडीवर आहेत. सुमोली येथून ऐदल सिंह कंसाना, दिमानी येथून गिर्राज दंडोतिया आणि महागाव येथून ओपीएस भदौरिया पिछाडीवर आहेत. या तीनही ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. 

10 Nov, 17:19 (IST)

भाजपा उमेदवार जजपाल जज्जी यांनी अशोकनगर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार जजपाल जज्जी अशोकनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजप नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

10 Nov, 16:50 (IST)

मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मीळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा करताना कार्यालयाबाहेर दिसत आहेत.

Load More

MP ByPoll Results 2020 Live: मध्य प्रदेश राज्याच्या राजकारणात झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर कमलनाथ (Kamal Nath) यांचे काँग्रेस (Congress) सरकार कोसळले. शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) सरकार सत्तेत आले. दरम्यानच्या काळात 28 जागांसठी लागलेल्या मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक 2020 (MP ByPoll Results 2020) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडत आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भाजपला 16 ते 18 जागा मिळतील. तर, काँग्रेस पक्षाला 10 ते 12 जागा मिळतील. या जागांसाठी मध्य प्रदेशमध्ये 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते.

मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत.दमोह येथून आमदार असलेल्या राहुल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर आता जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा 229 जागांच्या तुलनेत बहुमताचा आकडा 115 इतका राहिल. भाजप जवळ आता 107 आमदार आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाकडे 87 आमदार आहेत. (बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे ताज्या आणि ठळक घडामोडी इथे पाहा)

मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणी होत आहे. आजचा निकाल मध्य प्रदेशचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे. आजच्या निकालावरुनच कमल की कमलनाथ याचाही फैसला होणार आहे. आजच्या निकालावरुन काँग्रेस आणि भाजप आपापल्या पद्धतीने दावे प्रतिदावे करत आहेत. या दाव्यांतील तथ्य आज समोर येणार आहे.

मध्य प्रदेश पोटनिवडणूक निकाल 2020 बाबतचे ठळख घडामोडी आणि ताज्या बातम्या जाणूण घेण्यासाठी टेलेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा. यासोबतच बिहार विधानसभा निवडणूक 2020 बाबचे निकाल आणि त्या अनुशंगाने येणाऱ्या बातम्या, ठळक घडामोडी आपण लेटेस्टली मराठी वर पाहू शकता.


Show Full Article Share Now