Bihar Assembly Elections Results 2020 Live News Updates: बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय | 🗳️ LatestLY मराठी
Close
Advertisement
  सोमवार, सप्टेंबर 09, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Bihar Assembly Elections Results 2020 Live News Updates: बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय

बातम्या Dipali Nevarekar | Nov 11, 2020 03:17 AM IST
A+
A-
11 Nov, 03:15 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीचा तब्बल 18 तासानंतर संपूर्ण निकाल लागला आहे. या चुरशीच्या लढतीत एनडीए विजय झाला आहे. तर, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत एनडीएला 122 (भाजप- 72, जेडीयू- 42, व्हीआयपी- 4, एचएएम- 4) जागा मिळाल्या आहेत. तर, महागठबंधनला 110  ( आरजेडी-75, काँग्रेस-19, लेफ्ट- 16 ) जागा मिळाल्या आहेत. ट्विट-

 

11 Nov, 02:08 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 पैकी 236 जागेवर निकाल जाहीर झाला आहे. यापैकी एनडीएला 119 (भाजप- 70, जेडीयू- 41, व्हीआयपी- 4, एचएएम- 4), मिळाल्या आहेत. तर, महागठबंधनला 109 ( आरजेडी-74, काँग्रेस-19, लेफ्ट- 16 ) जागा मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त एमआयम- 5, बीएसपी- 1, एलजेपी-1 आणि इतरला 1 जागा मिळाली आहे. ट्विट-

 

11 Nov, 01:29 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 पैकी 229 जागेवर निकाल जाहीर झाला आहे. यापैकी एनडीएला 116 (भाजप- 68, जेडीयू- 40, व्हीआयपी- 4, एचएएम- 4), मिळाल्या आहेत. तर, महागठबंधनला 105 ( आरजेडी-71, काँग्रेस-18, लेफ्ट- 16 ) जागा मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त एमआयम- 5, बीएसपी- 1, एलजेपी-1 आणि इतरला 1 जागा मिळाली आहे. ट्विट-

 

11 Nov, 01:17 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरजेडी ईव्हीएमला दोषी ठरवतील, असे भाजप नेते सुशील मोदी म्हणाले आहेत. ट्विट- 

 

 

 

11 Nov, 01:11 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या 223 जागांचे निकाल समोर आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 

11 Nov, 00:17 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 पैकी 203 जागेवर निकाल जाहीर झाला आहे. यापैकी एनडीएला 102 (भाजप- 60, जेडीयू- 34, व्हीआयपी- 4, एचएएम- 3), मिळाल्या आहेत. तर, महागठबंधनला 90 ( आरजेडी-64, काँग्रेस-16, लेफ्ट- 13 ) जागा मिळाल्या आहेत. ट्विट-

 

10 Nov, 23:34 (IST)

भारतीय निवडणूक आयोग आज मध्यरात्री 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. ट्विट-

 

10 Nov, 23:17 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 पैकी 183 जागेवर निकाल जाहीर झाला आहे. यापैकी एनडीएला 90 (भाजप- 51, जेडीयू- 32, व्हीआयपी- 4, एचएएम- 3), मिळाल्या आहेत. तर, महागठबंधनला 86 ( आरजेडी-60, काँग्रेस-14, लेफ्ट- 12 ) जागा मिळाल्या आहेत. ट्विट-

 

 

10 Nov, 23:04 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. ट्विट-

 

10 Nov, 22:53 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाचा एका जागेवर विजय मिळवला आहे. ट्वीट-

 

Load More

आज सार्‍यांचं लक्ष बिहार विधानसभा निवडणूक निकालांकडे लागलं आहे. आरजेडी, कॉंग्रेस आणि डावे यांच्या विरूद्ध भाजपा आणि जेडीयू पक्षामध्ये आज मतदार कुणाच्या बाजुने कौल देतात? हे पाहणं उत्सुकतेचे आहे. दरम्यान 243 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकालाची मोजणी सकाळी 8 च्या सुमारास सुरू होणार आहे. अंदाजे 9 वाजेपर्यंत पहिला कल हाती येईल आणि त्यानंतर हळूहळू चित्र स्पष्ट होण्यास सुरूवात होणार आहे. या निवडणूकीमध्ये नितीश कुमार या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना लालूप्रसाद यादव यांच्या लेकाने म्हणजेच तेजस्वी यादवने आव्हान दिले आहे. प्रचारसभेमध्ये गर्दी कमावलेला हा तरूण, उमदा 31 वर्षीय नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का? याचं चित्र देखील आज स्पष्ट होणार आहे. यासोबतच यंदा चिराग पासवान यांच्या चेहर्‍यावर लोकजनशक्ती पार्टी देखील भाजपा मधून बाहेर पडत बिहारची निवडणूक लढली आहे. दरम्यान निवडणूक निकालातील क्षणाक्षणाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टलीच्या पेजला नक्की भेट द्या.

कोरोना संकट काळात राज्यभर पार पडलेली बिहार विधानसभा ही पहिलीच निवडणूक आहे. 3 टप्प्यांत यंदा सुरक्षितपणे 243 जागांवर निवडणूका पार पडल्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच 28 ऑक्टोबरला 71, 3 नोव्हेंबरला दुसर्‍या टप्प्यात 94 तर आज तिसर्‍या टप्प्यात 78 जागांवर मतदान पार पडले आता याचा अंतिम निकाल आज जाहीर केला जाणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यावर्षी बिहार मध्ये एनडीए आणि युपीए मध्ये कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. पण जनमत महागठबंधनच्या बाजूने झुकेल असा अंदाज आहे.

2015 साली बिहारच्या विधानसभेमध्ये आरजेडी सर्वाधिक 80 जागांवर विजयी झाली होती. त्यांच्यापाठोपाठ नीतीश कुमार यांची जेडीयू होती त्यांच्याकडे 71 जागा होत्या. भाजपा कडे 54, कॉंग्रेस कडे 27,एलजेपी कडे 2, आरएलएसपी कडे 2, हम कडे 1 आणि अन्य 7 असे पक्षीय बलाबल होते.


Show Full Article Share Now