Voting | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारतामध्ये आज लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Election) सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आहे. बिहार मध्येही आज मतदान आहे. एका 80 वर्षीय महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. अशात कुटुंबाने तिच्या अंत्यविधी आधी मतदानाला प्राधान्य देत आपला अधिकार बजावला आहे. ही घटना Jehanabad लोकसभा मतदारसंघातील Devkuli गावातील आहे.

मिथिलेश यादव यांनी आज (1 जून) सकाळी आपली आई गमावली आहे. पण हे दु:ख बाजूला ठेवत त्यांनी आपला मतदानाचा हक्क आधी बजावला आहे. PTI शी बोलताना त्यांनी, 'आज सकाळी माझ्या आईचं निधन झालं. आता ती परत तर येणार नाही. तिचा अंत्यविधी थोडा उशिराने करणं शक्य आहे. आता मतदान पुन्हा 5 वर्षांनी येणार त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून हा विषय बोलून आधी मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्णय घेतला आणि नंतर अंत्यविधी केला जाणार' अशी भावना बोलून दाखवली आहे. Lok Sabha Elections 2024: सलग आठ वेळा मतदान करणं तरुणाला भोवलं, व्हिडिओ व्हायरल होताच ECI कडून कारवाई (Watch Video) .

लोकशाही मध्ये मतदानाचा दिवस हा उत्सवाप्रमाणे असतो. सध्या 18 व्या लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. आज 1 जून दिवशी सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान आहे. या निवडणूकीचे निकाल 4 जून दिवशि लागणार आहे. अशात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने कडाक्याच्या उन्हातही रांगा लावून मतदान केल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहे. अनेकदा लग्न सोहळ्यात वधू वर आपल्या सोहळ्यातून वेळ काढून मतदान करताना पाहिले आहेत पण आईच्या निधनासारखं दु:ख बाजूला ठेवत मतदान करण्याला प्राधान्य देणरं हे चित्र अनेकांना आज नकळत प्रेरणा देऊन जाणारं आहे. आज 3 वाजेपर्यंत बिहार मध्ये 42.95% मतदान झाले आहे.