Bihar: वडिलांनी दाखल केली अपहरणाची FIR, मुलीने फेसबुकवर Got Married म्हणत केली पोस्ट
Representational image (Photo Credits: Unsplash)

Bihar: बिहार मधील हाजीपुर मध्ये सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी स्वत:चे अपहरण हे खोटे असल्याचे सांगत आहे. तसेच तिने पोलिसांनी मदत करावी असे आवाहन केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर असे कळले की, मुलगी ही गोरौल ठाणे येथील मलिकापुरा येथे राहणारी आहे. मुलीच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी गोरौल ठाण्यात मुलीच्या अपहरणाची एफआयआर दाखल केली होती.

एफआयआर दाखल केल्यानंतर मुलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने Got Married अशी पोस्ट केली. त्यानंतर व्हिडिओ आणि फोटो टाकल्यानंतर तिने ती स्वत: अल्पवयीन असल्याचे म्हणले आणि वडिल त्रास देत असल्याचा आरोप लावला आहे. मुलीने अपहरणाची एफआयआर दाखल केल्यानंतर आता पोलिसांच्या मदतीची मागणी केली आहे.(Drug Case: बेंगळुरूमध्ये 3 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यासह दोन नायजेरियन लोकांना अटक)

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलीसोबत एक मुलगा सुद्धा दिसून येत आहे. त्यामध्ये तिने आपल्या मर्जीने तरुणाशी लग्न केले असून ती खुश आहे. तसेच आता घरातील मंडळींनी त्रास देऊ नये असे आवाहन सुद्धा तिने केले आहे.

एफआयआर नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आहे. तसेच यामध्ये वाद सुद्धा असल्याचे दिसून आले आहे. सध्या पोलिसांकडे एफआयआर दाखल केल्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. मुलीने व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ती गायब झाली आहे. तर या घटनेमागील सत्य कधी समोर याची आता प्रतीक्षा केली जात आहे.