बिहार: वर्षभर रिलेशनशिप, प्रेयसीसोबत जबरदस्ती लग्न करत विवाहाच्या पहिल्या रात्री विष देऊन हत्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या प्रेमविवाह केला तरीही कोणीही विरोध करत नाही. मात्र काही वेळेस एकमेकांवर प्रेम असून लग्न करता येत नाही. यासाठी विविध अडथळे निर्माण केले जातात. मात्र जर एक वर्षाने प्रेमसंबंध आणि त्यानंतर जबरदस्तीने प्रेयसी सोबत केलेले लग्न ही न पटण्यासारखी गोष्ट आहे. या गोष्टीचा शेवट नेमका काय होईल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार बिहार (Bihar) येथे घडला असून लग्नाच्या पहिल्या रात्रीच बायकोला विष देऊन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मधुबनी जिल्ह्यातील एका तरुणीचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तिला प्रियकरासोबत राहण्यचा आदेश देण्यात आला. यामुळे मुलीच्या घरातील मंडळींनी तिचे प्रियकरासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले. तर लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने तिला विष देत तिची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन त्याच्या घरातील मंडळींसोबत पळ काढला.(उत्तरप्रदेश: लग्नाच्या पहिल्याच रात्री सासरच्या मंडळींना वाढले स्वत:च्या हातचे जेवण, त्यानंतर काय झाले वाचा सविस्तर)

मात्र दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरातील मंडळी तिला भेटण्यासाठी आले त्यावेळी त्यांना हा सर्व प्रकापर समजला. तसेच मुलीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. यामुळे जबरदस्तीने लावून दिलेले मुलीचे लग्न तिच्या घरातील मंडळींच्या अंगाशी आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्याचा अधिक तपास केला जात आहे.