Bihar: गाढवाच्या लाथेने म्हशीचा मृत्यू, मालकासह त्याच्यावर FIR ची मागणी
Donky (Photo Credits-Facebook)

बिहारमध्ये रोहतास जिल्ह्यातील दावथ ठाणे परिसरात सहिनाव गावातील एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका विकृत गाढवाने तगड्या म्हशीला लाथ मारल्याने तिचा मृत्यू झाला. आता मृत्यू झालेल्या म्हशीचा मालक मुनि चौधरी याने पोलिसात एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये गाढव आणि त्याच्या मालक इलियास हुसैन या दोघांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.(Thirsty Snake Drinks Water Viral Video: सापाला पाजले पाणी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

दुसऱ्या बाजूला गाढवाने लाथ मारल्याने म्हशीचा मृत्यू कसा झाला याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दावथ ठाण्याचे अध्यक्ष अतवेंद्र कुमार यांनी असे म्हटले की, म्हशीच्या मालकाने एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. सध्या पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे. तपासानंतर कारवाई केली जाणार आहे.(अमेरिकन फोटोग्राफर David Hobby यांनी शेअर केला मेंढ्याच्या असा व्हिडिओ, तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही Watch Video)

गाढवाच्या अशा वागण्यामुळे मालकाला सुद्धा आरोपी ठरवले जात आहे. रस्त्यावरुन गाढवाच्या पाठीवरुन सामान वाहून नेले जात होते. त्याचवेळी म्हशीला गाढवाने लाथ मारली आणि ती जागच्या जागी मृत पावली.गावातील लोकांनी असे म्हटले की, गाढव हा हिंसक आणि  अधिक बिघडला आहे. दुसऱ्या जनावरांवर सुद्धा तो अशाच प्रकारे हल्ले करतो. यापूर्वी ही गाढवाने एका गाईचा जीव घेतला होता. मात्र आता म्हशीला मारले. सध्या पोलिसांकडून अर्जानुसार तपास करत आहेत.