
जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काही वस्तू खरेदी करत असल्यास त्याबाबत सावधगिरी बाळगणे अत्यावश्क असते. कारण काही वेळेस तुम्ही खरेदी केलेली वस्तू तुटलेली किंवा त्याची अदलाबदल करुन डिलिव्हरी करण्यात आल्याचे काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता अजून एक भर पडली असून बिहार मधील एका ग्राहकाने स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन लॅपटॉप खरेदी केला. मात्र लॉपटॉपची डिलिव्हरी म्हणून त्याला बॉक्समध्ये फाटलेले बूट मिळाल्याचा प्रकार घडला आहे.
इमादपुर मधील एका सायबर कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीने स्नॅपडिल वरुन 22 ऑक्टोबरला लेनोवो कंपनीचा लॅपटॉप खरेदी केला. मात्र बुधवारी जेव्ही लॅपटॉपची डिलिव्हरी पार्सल आले त्यावेळी त्याला फाटलेले बुट आणि टाइल्स मिळाल्या. हे पाहून तेथील स्थानिकांनी डिलिव्हरी बॉयवर संताप व्यक्त करत त्याला पकडले. तर ज्या व्यक्तीने लॅपटॉप खरेदी केला असता त्याचे पैसे डेबिट कार्डने 21 हजार रुपये भरले. मात्र आता फाटलेले बुट पाहून त्याला चांगलाच चुना लागल्याने संपात व्यक्त करण्यात येत आहे.(WhatsApp वर व्हायरल होतोय फुकटात Adidas कंपनीचे शूज मिळत असल्याचा मेसेज, युजर्सनी सावध रहा नाहीतर फसवणूक होईल)
या प्रकारानंतर पकडून ठेवलेल्या डिलिव्हरी बॉयने कंपनीच्या वरिष्ठांसोबत ग्राहकाचे बोलणे करुन दिले. त्यावर कंपनीच्या वरिष्ठांनी त्याला पुढील 72 तासात लॅपटॉपची डिलिव्हरी करु असे आश्वासन दिले आहे. तर सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगवर मोठ्या प्रमाणात वस्तूंवर सूट देण्यात येते. मात्र या दरम्यान फसवणुकीचे प्रकार सुद्धा अधिक होत असल्याने ग्राहकांना त्यापासून वाचण्यासाठी वारंवार सुचना देण्यात येते.