प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बिहार (Bihar) येथील एका रिक्षाचालकाने सीट बेल्ट न लावल्याने वाहतूक नियमानुसार चलान कापले असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. खरंतर रिक्षाला कोणताही सीट बेल्ट नसतोच तरीही अशा पद्धतीने कोणतीही चुकी नसताना चलान कापले आहे.

मुजफ्फरपुर मध्ये एका रिक्षाचालकाने सीट बेल्ट न लावल्याने त्याच्याकडून दंड वसूल केला आहे. स्थानिक पोलीस अध्यक्ष अजय कुमार यांनी असे म्हटले आहे की, सीट बेल्ट न लावल्याने रिक्षाचालकाकडून चलान कापण्यात आले आहे. तसेच चालक अत्यंत गरिब असल्याने त्याला फक्त हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.(नवा मोटार कायदा हा केवळ लोकांचे प्राण वाचावे यासाठी सरकारी तिजोरी भरण्यासाठी नव्हे- नितीन गडकरी)

1 सप्टेंबर पासून नव्या वाहतूकीच्या नियमानुसार दंडाच्या रक्कमेत दहापट अधिक वाढ करण्यात आली आहे.तर काही दिवसांपूर्वीच असाच एक विचित्र प्रकार समोर आला होता. त्यावेळी वाहतूक नियमाचे सात वेळा उल्लंघन केल्याने एका ट्रकवर 6.53 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.त्याचसोबत देशातील विविध भागामधून सुद्धा वाहतूकीचे नियम मोडल्याने करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची भरपूर प्रकरणे समोर आली आहे. तर दिल्ली येथील एका तरुणाने त्याच्या शानदार बाईकवर लावण्यात आलेल्या दंडामुळे ती जाळून टाकल्याचा विचित्र प्रकार घडला होता.

परंतु सरकारने लागू केलेल्या नवा मोटार कायद्यावरून सध्या काही नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत असून विरोधी पक्षांसह अनेक स्तरांतून सरकारवर कडाडून टीका केली जात आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय हा जनतेच्या हितासाठी असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपले मत व्यक्त केले होते.