
Terror Attack Suspect Arrested: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) सुरक्षा यंत्रणा बैसरण खोऱ्याच्या आसपासच्या जंगलात खोऱ्यात सतत शोध मोहीम राबवत आहेत. दरम्यान, मंगळवारी पहलगाममधील सर्किट रोडवर सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान एका संशयास्पद व्यक्तीला अटक (Arrested) केली. जेव्हा संशयिताला पकडण्यात आले तेव्हा त्याने बुलेट प्रूफ जॅकेटचे कव्हर (Bulletproof Jacket) घातले होते.
संशयिताची ओळख पटली -
प्राप्त माहितीनुसार, संशयिताची ओळख बिलाल अहमद अशी झाली आहे. सुरक्षा दलांनी विचारपूस केली तेव्हा बिलालने अस्पष्ट आणि संदिग्ध उत्तरे दिली. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे. प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -Security Mock Drills On May 7: पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशात होणार सुरक्षा मॉक ड्रिल; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये होणार हा सराव)
दरम्यान, सुरक्षा दलांनी त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट कव्हर कुठून मिळाले? असा प्रश्न केला. यावर संशयिताने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर सुरक्षा दलांनी संशयिताची मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मानसिकदृष्ट्या आजारी असून त्याने बुलेटप्रूफ जॅकेटसारखे हाफ जॅकेट घातले होते. (वाचा - Civil Defence Mock Drill On May 7: भारतात 1971 नंतर पहिल्यांदाच 7 मे दिवशी 'सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स' घेण्याचे केंद्राचे आदेश; जाणून घ्या मॉक ड्रिल्स मध्ये काय होणार)
दहशतवादी हल्ल्यातील संशयिताला अटक -
🚨 Suspicious Man Caught With Bulletproof Jacket Cover In Basaran Valley
📍During a CASO in the forests around the Basaran Valley, security forces apprehended a suspicious individual yesterday.
📍The suspect, later identified as Ahmed Bilal, was wearing a bulletproof jacket… pic.twitter.com/QUwGdcaTP2
— OsintTV 📺 (@OsintTV) May 6, 2025
पोलिस सध्या त्याच्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संशयास्पद परिस्थितीत पकडलेल्या व्यक्तीला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 26 पर्यटकांना गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोध कठोर निर्णय घेतले असून हल्ल्याला प्रतिउत्तर दिलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे.