Prajwal Revanna (फोटो सौजन्य - फेसबुक)

Rape and Sexual Assault Case: कर्नाटकचे जेडीएस नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांना बलात्कार प्रकरणात (Rape Case) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला नाही. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याची याचिकाही फेटाळून लावली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही खूप शक्तिशाली आहात. तुमच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणी प्रज्वल रेवण्णाला जामीन देण्यास हायकोर्टानेही नकार दिला होता. 21 ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने रेवण्णाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे तीन गुन्हे -

प्रज्वल रेवन्ना याच्यावर लैंगिक छळाचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. प्रज्वल रेवन्ना याच्यावरील आरोपांमुळे जेडीएसने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते. लैंगिक छळ प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रज्वल रेवन्ना याने आत्मसमर्पण करण्यापूर्वी एक व्हिडिओ संदेश पाठवला होता. ज्यामध्ये त्याने 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. (हेही वाचा -Prajwal Revanna Bail Plea Rejected: लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला दिलासा नाही; कर्नाटक न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज)

ऑगस्ट 2024 मध्ये कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (SIT) प्रज्वल रेवन्ना विरुद्ध बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या चार प्रकरणांमध्ये 2,144 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात रेवन्ना यांच्यावर आपल्या कुटुंबासाठी घरगुती मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. (हेही वाचा - Former JD(S) MP Prajwal Revanna ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

प्रज्वल रेवन्ना याच्यावर बलात्काराचे दोन गुन्हे आणि लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल आहे. प्रज्वल रेवन्ना हा जेडीएस आमदार एचडी रेवन्ना यांचा मुलगा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत.