भुपेन हजारिका यांच्या कुटुंबियांचा 'भारतरत्न' स्विकारण्यास नकार
भुपेन हजारिका यांच्या कुटुंबियांचा 'भारतरत्न' स्विकारण्यास नकार (फोटो सौजन्य-ट्वीटर)

आसाम (Assam) मधील दिवंगत शास्रीय गायक भुपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांना देण्यात  आलेला 'भारतरत्न'(Bharat Ratna) पुरस्कार   कुटुंबियांनी  स्विकारणार नसल्याचे इशारा दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ ही भुमिका घेण्यात आली आहे. तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनावेळी हजारिका यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येणार होता.

'भारतरत्न' पुरस्कारावरुन हजारिका यांच्या कुटुंबियांमध्ये मतभेद सुरु आहेत. तर भुपेन हजारिका यांचे पुत्र तेज यांनी हा पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला आहे. मात्र हजारिका यांचे मोठे बंधू समर हजारिका यांनी भारतरत्न न स्विकारण्याच्या बाबत सहमत नसल्याचे म्हटले आहे.

ईशान्यमधील राज्यांचा नागरितकत्व सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध केला जात आहे. तसेच काही दिवसांपुर्वी आसमच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.