कोविड-19 च्या भीतीने पतीचे पत्नीपासून Physical Distancing; नपुंसकतेचा आरोप खोटा सिद्ध करण्यासाठी पतीची Medical Test
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात आपल्या पत्नीपासून फिजिकल डिस्टसिंग (Physical Distancing) ठेवल्यामुळे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका दांपत्याचा संसार मोडीस येणार होता. पत्नी पासून फिजिकल डिस्टसिंग मध्ये राहिल्यामुळे पती नपुंसक असल्याचा संशय पत्नीला आला आणि तिचा हा संशय खोटा ठरवण्यासाठी त्याला चक्क मेडिकल टेस्ट करावी लागली. सोशल डिस्टसिंग पाळत शारीरिक संबंध न ठेवता राहत पती राहत असल्याने पत्नीने नपुसंकतेचा संशय बळावला आणि तिने सासर सोडून माहेरी राहण्यास सुरुवात केली.

आपल्या पतीकडून मेंटेनेंस अलाउंस मागण्यासाठी लिगल सर्व्हिस ऑथारीटीला संपर्क केला असता ही घटना प्रकाशझोतात आली. "माझ्यापुढे माझं खूप मोठं आयुष्य आहे आणि त्यासाठी मेंटेनेंस अलाउंस ची मागणी करण्यासाठी मी ऑथरीटीसची संपर्क साधला," असे पत्नीने न्यूज 18 शी बोलताना सांगितले.

मी केवळ कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी पत्नीपासून सोशल डिस्टसिंगमध्ये राहत होतो. 29 जून रोजी आमचे लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीच्या परिवारातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मी सोशल डिस्टसिंग पाळत होतो, असे स्पष्टीकरण पतीने कॉऊन्सिलरशी बोलताना दिले आहे. यावर तोगडा म्हणून मेडिकल टेस्ट करुन नपुसंकतेचा आरोप पुसून टाकण्याचा सल्ला काऊन्सिलरने पतीला दिला. (COVID-19 May Cause Erectile Dysfunction? कोरोनामुळे पुरुषांमध्ये नपुसंकतेचा धोका, डॉक्टरांचा दावा)

पतीने त्यानंतर मेडिकल टेस्ट करुन नपुसंकतेचा आरोप चुकीचा सिद्ध केला आणि आपल्या पत्नीला परत घरी बोलावून घेतले, असे न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पती कोविड-19 मुळे खूप घाबरला होता. आपल्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली असून परंतु, तिच्या चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे तिच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत, असा संशय पतीला होता.

दरम्यान, कोविड-19 हे जागितक आरोग्य संकट अनेक प्रश्न, समस्या जोडीला घेऊन आल्याचे दिसून येत होते. परंतु, ही एक वेगळीच समस्या दांपत्य जीवनात उद्भवल्याचे निर्दशनास आले.