प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख यांना 'भारतरत्न' जाहीर
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Photo Credits- twitter)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Dr. Pranab Mukherjee ), जेष्ठ गायक भुपेन हजारीका (Dr. Bhupen Hazarika) आणि नानाजी देशमुख (Nanaji Deshmukh ) यांना भाररत्न (Bharat Ratna)पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात येते. नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर राजकरणातील योगदानाचे महत्व लक्षात घेऊन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

भारतरत्न पुरस्काराचा मान कोणाला मिळावा यासाठी पंतप्रधांनाकडून नावाची शिफारस केली जाते. प्रणव मुखर्जी हे मोदी सरकार आल्यावरही राष्ट्रपदाचा भार सांभाळत होते.