भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि सरकार आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत. शेतकरी आणि दुकानदारांनाही या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शनच्या मुद्द्यांवरून भारत बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत. (हेही वाचा - Wrestlers Protests: कुस्तीपटूंबाबत सरकारला अल्टिमेटम; राकेश टिकैत म्हणाले-'बृजभूषण सिंगला 9 जूनपर्यंत अटक करावी, अन्यथा...' (Watch))
पाहा पोस्ट -
#WATCH 16 फरवरी को भारत बंद का आह्वान किया गया है, जिसमें संयुक्त किसान मोर्चा के साथ और भी बहुत सारे संगठन हैं। किसान 16 फरवरी को खेत में काम न करें। दुकानों को भी बंद रखने का अनुरोध है। इसमें MSP, नौकरी, अग्निवीर, पेंशन आदि मुद्दे उठाए जाएंगे: भारतीय किसान यूनियन के राष्ट्रीय… pic.twitter.com/5UPQBAKOU0
— ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2024
शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात काम करत नाहीत. त्यामुळे 16 फेब्रुवारी रोजी अमवास्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये. दुकानेही बंद ठेवण्याची विनंती आहे. या संघटनांनी एमएसपीवर पीक खरेदीची हमी द्यावी, अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, लहान आणि मध्यम शेतकरी कुटुंबांची कर्जमाफी आणि कामगारांना किमान २६ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळावे अशी मागणी या संघटनांनी केली आहे.