Bharat Bandh (Photo Credits: PTI)

Bharat Bandh 2020: केंद्र सरकारच्या आर्थिक रणनितींच्या विरोधात देशभरात येत्या 8 जानेवारी रोजी भारत बंद (Bharat Bandh 2020) ची हाक देण्यात आली आहे. या बंदला 10 केंद्रीय व्यापारी संघटना, डावे पक्ष आणि अनेक बँकाचे कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा आहे. 8 जानेवारीला होणाऱ्या भारत बंतचा परिणाम बँकींग व्यवहारावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक खातेदारक आणि ग्राहकांना जर आपली बँकींग कामे तत्काळ करायची असतील त्यासाठी ती कामे 8 जानेवारीपूर्वीच आटोपल्यास होणारी गैरसोय टाळता येऊ शकते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ज्या बँकेचे कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी होतील त्या ठिकाणी बँकेच्या कामांना विलंब लागू शकतो. काही बँका बुधवारी बंद राहू शकतात. काही संघटनांनी म्हटले आहे की, बँक कर्मचारी आणि बँक अधिकारी बँकेची चावीच घेत नसल्यामुळे बँक कार्यालय उघडनेच कठीण होऊन बसेन. (हेही वाचा, केंद्र सरकारच्या कामगाराविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांची 8 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक)

दरम्यान, बँका बंद असतील तर 8 आणि 9 जानेवारी या दोन दिवसांमध्ये एटीएममध्येही पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. 9 जानेवारी नंत बँका उघडतील मात्र, एटीएममधील पैशांचा तुटवडा कायम राहू शकतो. त्यामुळे पैशाशी संबंधीत कामांचा निपटारा लवकरात लवकर केल्यास संभाव्य अडचण टाळता येऊ शकते. दरम्यान, ऑनलाईन सेवा नियमितपणे सुरु राहणार असून, त्यात तांत्रिक अडचण वगळता कोणत्याही प्रकारे गैरसोय असणार नाही.