Gay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल
Gay and Divorce | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

कर्नाटक (Karnataka) राज्यातील बंगळूरु (Bengaluru) येथील एका 28 वर्षीय महिलेने आपल्या पतिविरुद्ध घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. एका समलैंगिक अॅपवर (Gay App) पतीचे प्रोफाईल पाहिल्यानंतर पत्नीने हे पाऊल उचलले आहे. पत्नीने महिला हेल्पलाईन केंद्राकडे मदत मागितली आहे. या मागणीनंतर बसवनागुडी पोलिसांनीही (Basavanagudi Police Station) खटला दाखल करत चौकशी सुरु केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएनएसने म्हटले आहे की, या पती-पत्नीच्या कुटुंबीयांनी एक संवाद बैठक आयोजित केली होती. परंतू, महिलेने न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पतीने सुरुवातीला पत्नीने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत नकार दिला. मात्र, नंतर त्याने कबूल केले की, अपण समलैंगिक डेटींग अॅपवर (Gay Dating Apps) आपले प्रोफाईल उघडले आहे

महिला एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करते. या महिलेचा जून 2018 मध्ये 31 वर्षीय व्यक्तीसोबत विवाह झाला होता. पतीचा हा दुसरा विवाह होता. पत्नी असलेल्या तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, पतीने तिच्यापासून त्याची लैंगिक ओळख लपवली आणि तिची फसवणूक केली. तिचा विवाह कुटुंबातील वडीलधारऱ्या मंडळींनी निश्चित केली होती. पती एका प्रतिष्ठीत बॅकेत नोकरी करतो. पती पत्नी एकत्र राहात असूनही पतीने पत्नीपासून दुरावा ठेवला होता. त्यामुळे जेव्हा तिने चौकशी केली तेव्हा पतीने सांगितले की, पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आपल्याला बसलेल्या धक्क्यातून आपण अद्याप सावरलो नाही. (हेही वाचा, Transgender Reservation: ट्रान्सजेंडर समूहाला सरकारी नोकरीत आरक्षण, कर्नाटक सरकारचे ऐतिहासिक पाऊल)

दरम्यान, लग्नाला काही काळ गेल्यानंतर लग्नामध्ये हुंड्यापोठी काही रक्कम दिली नाही म्हणून पतीने चिडचिड सुरु केली. त्याने तिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यासही सुरुवात केली. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात पत्नीने पाहिले की, पती सातत्याने मोबाईलवर अनोळखी व्यक्तीशी बोलतो. लॉकडाऊनमध्ये त्याचे वर्तन अगदीच बदलून गेले होते. दुसऱ्या लॉकडाऊन काळात त्याच्याबाबतचा संशय अधिकच वाढल्याने तिने पत्नीने पतीचा मोबाईल तपासला. त्यानंतर तिला समजले की, पतीचे समलैंगिक डेटिंग ऐप्स (Gay Dating Apps) वर प्रोफाईल आहे. इतकेच नव्हे तर तो अॅपवरील फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या अनेक लोकांशी चॅट करत संवादही सादत आहे, असेही तिच्या लक्षात आले.

लॉकडाऊन प्रतिबंद हटल्यानंतर पत्नीने महिला हेल्पलाईनकडे पतीबाबत तक्रार नोंदवली होती. दरम्यान, पतीने सुरुवातीला पत्नीने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत नकार दिला. मात्र, नंतर त्याने कबूल केले की, अपण समलैंगिक डेटींग अॅपवर आपले प्रोफाईल उघडले आहे आणि अनेक युजर्ससोबत संवादही साधला आहे.