फोटो सौजन्य- Unsplash

बंगळूरु (Bengaluru) येथे चिकनच्या नावाखाली कुत्र्याचे मांस विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर असा दावा केला जात आहे की, कुत्र्यांची कत्तलखान्यात हत्या करुन ते हॉटेल आणि मटनांच्या दुकानावर पुरवले जात आहे. यापूर्वीसुद्धा बड्या बड्या हॉटेलमध्ये चिकनच्या नावावर कुत्र्याचे मांस खाण्यास देण्यात आल्याचा प्रकार घडले आहेत.

आजतक यांनी दिलेल्या वृत्तानुसार, वीबीएचवी अपार्टमेंट बंगळुरु रेजिडेंट वेल्फेअर असोसिएशन यांनी तमिळनाडूच्या एका कंपनीला कुत्र्यांना या ठिकाणाहून हटवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे असा दावा केला जात आहे की परिसरातील कुत्र्यांची हत्या करुन ते चिकनच्या नावाखाली विकले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.(धक्कादायक! पाण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुनेला जिवंत जाळले; 6 जणांवर गुन्हा दाखल, सर्वजण फरार)

अशा पद्धतीची घटना प्रथमच घडली नसून कुत्रे यापूर्वीसुद्धा गायब झाले होते. अधिकारी हरीश यांनी असे सांगितले आहे की, मोकाट कुत्र्यांचे यापूर्वीसुद्धा मांस विकले गेले आहे. परंतु नागरिकांकडून या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.