Bank Strike: खाजगीकरणाच्या विरोधात SBI, PNB, Bank of Baroda सह 'या' बॅंक कर्मचार्‍यांचा 16,17 डिसेंबर दिवशी बंद; बॅंक सर्व्हिस,  ATMs वर परिणाम होण्याची शक्यता
Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

आज आणि उदया म्हणजेच 16,17 डिसेंबर दिवशी देशभर सरकारी बॅंकामधील कर्मचारी बंद (Bank Strike) पाळणार असल्याने तुमची कामं रखडण्याची शक्यता आहे. देशभर सार्वजनिक बॅंकामधील 9 लाख कर्मचारी दिन दिवसीय संपामध्ये सहभागी होणार आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बॅंक (PNB), बॅंक ऑफ बडोदा (Bank Of Baroda), सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (Central Bank Of India) यांचा संपामध्ये समावेश आहे.

बॅंक युनियन च्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बॅंकांचा संप सरकारी बॅंकांचे होत असलेले खाजगीकरण यांच्या विरोधात आहे. ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कनफेडरेशन च्या महासचिव सौम्य दत्ता यांच्या माहितीनुसार, अतिरिक्त मुख्य श्रम आयुक्त यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. परिणामी यूनियन कडून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसबीआय सह अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना संपाची माहिती देत चेक क्लिएअन्स, फंड ट्रान्सफर सारख्या बॅंकिंग सेवांवर त्याचा परिणाम होणार असल्याचं सांगितलं आहे. दोन दिवसांच्या संपानंतर 19 डिसेंबरला सुट्टी असल्याने बॅंक बंद राहणार आहे. त्यामुळे बॅंक ग्राहकांना काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. हे देखील वाचा: Central Bank Of India मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 17 डिसेंबर पूर्वी करता येईल अर्ज .

केंद्र सरकार कडून बजेट 2021-22 मध्ये यावर्षी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंकांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सरकार कडून त्याची तयारी सुरू झाली असून Banking Laws (Amendment) Bill 2021 हिवाळी सत्रात येण्याची तयारी आहे.