शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Jayanti) यांची आज 94वी जयंती आहे. थेट सक्रिय राजकारणात सहभाग नसूनही दबदबा टिकवून ठेवणारे बाळासाहेब यांचे नेतृत्व बहुआयामी होते. व्यंगचित्रकार, पत्रकार, संपादक, राजकारणी, उत्तम वक्ते, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू सर्वज्ञात आहेत. बाळासाहेबांचे व्यासपीठावरील बोल जितके जहाल होते तितकाच दिलखुलास स्वभाव त्यांच्या मैत्रीच्या नात्यात दिसून येतो. राजकारण, समाजकारण सोडल्यास क्रीडा व कलाक्षेत्रातही त्यांचे अनेक मित्र होते. हिंदुत्व (Hindutva) आणि मराठी बाण्याचा बाळासाहेबांचा लढा हा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाचा आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त मुंबईत शिवतीर्थावर अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे तर सोशल मीडियावर देखील राजकीय मंडळींनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासहित भाजपच्या (BJP) नेत्यांचा देखील समावेश आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा एक खास व्हिडीओ शेअर करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट मध्ये "लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास ज्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही, लाखो लोकांना प्रेरणा दिली, ते नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान असणार आहेत असे म्हणत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी ट्विट
Tributes to the great Balasaheb Thackeray on his Jayanti. Courageous and indomitable, he never hesitated from raising issues of public welfare. He always remained proud of Indian ethos and values. He continues to inspire millions.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2020
नितीन गडकरी ट्विट
हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन pic.twitter.com/kqnnrxG6d9
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 23, 2020
दरम्यान, महाराष्ट्र सत्ता संघर्षानंतर भाजप व शिवसेनेची समीकरणे बदलली असली तरीही न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना मात्र आवर्जून श्रद्धांजली वाहिली आहे.
देवेंद्र फडणवीस ट्विट
कठोर अन् प्रेमळ...
प्रेरणादायी अन् उर्जावान...
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील...#HinduHrudaySamrat #BalasahebThackeray pic.twitter.com/zvSKRzyn82
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2020
चंद्रकांत पाटील ट्विट
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन...!#balasahebthackeray pic.twitter.com/wTHXMjZTpI
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 23, 2020
पंकजा मुंडे ट्विट
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! #balasahebthackeray pic.twitter.com/BaaqBWCeUv
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 23, 2020
राधाकृष्ण विखे पाटील ट्विट
देशातील राजकीय क्षितिजावर वक्तृत्व, लेखन तसेच उच्च विचारांनी सर्वोच्च स्थान मिळवणारे तमाम जनतेचे आधारस्तंभ श्री. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/aOOybCuVxq
— R Vikhe Patil (@RVikhePatil) January 23, 2020
आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुंबईत मनसे आणि शिवसेनेतर्फे दोन वेगळ्या खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, मनसेचे महा अधिवशेन तर शिवसेनेचा जल्लोष सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.