Badrinath | Twitter

उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये जोशी मठाजवळ काल (4  मे) दरड कोसळल्यानंतर आता बद्रीनाथ महामार्ग (Badrinath National Highway) पूर्ण बंद करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही बाजूचे पर्यटक सध्या अडकलेले आहेत. जोशीमठजवळील हेलंग (Helang) खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी जमिनीखाली लावण्यात आलेल्या एका सुरूंगामध्ये दरड कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बद्रीनाथ महामार्गावर हेलांग येथे डोंगरावरून दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यानंतर प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ देखील वायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच यंदाची चारधान यात्रा सुरू झाली पण आधी पाऊस आणि बर्फवृष्टीने यामध्ये अडथळा आला होता आता या दरड कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासूमध्ये बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितलं आहे.

पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण व्हिडिओमध्ये जेव्हा ही घटना झाली तेव्हा आजूबाजूला उपस्थित काही लोकांनी आरडाओरड केल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले आहे. Digital Donations at Kedarnath Temple: पेटीएम सुपर अ‍ॅपद्वारे भाविक केदारनाथ मंदिराला ऑनलाईन पद्धतीने देऊ शकतात देणगी .

सध्या कर्णप्रयागचे सीओ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता सुरू केला की प्रवाशांना ये-जा करण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत कोणालाही या महामार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी नसेल, सुरक्षेच्या कारणांमुळे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे."