Digital Donations at Kedarnath Temple: पेटीएमचा अग्रगण्य डिजिटल पेमेंट ब्रँड असलेल्या One97 Communications Ltd (OCL) ने बुधवारी केदारनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना Paytm QR कोड स्कॅन करून Paytm UPI किंवा Wallet वापरून देणगी देण्याची सुविधा सुरु केली आहे. पेटीएम सुपर अॅपद्वारे भारतभरातील भाविक उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या पवित्र मंदिराला दान देऊ शकतात."भारतातील QR आणि मोबाईल पेमेंटचे प्रणेते म्हणून, आम्ही केदारनाथ मंदिरात डिजिटल देणगी देण्याची सुविधा सुरु केली आहे, जेथे भाविक मंदिरात पेटीएम QR कोड स्कॅन करू शकतात आणि पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेटद्वारे दानदेणगी देऊ शकतात," पेटीएमच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. "आम्ही आमचे नाविन्यपूर्ण मोबाईल पेमेंट सोल्यूशन्स देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून आर्थिक समावेशासाठी वचनबद्ध आहोत," असे ते पुढे म्हणाले. केदारनाथ मंदिर हे चार धाम यात्रेतील सर्वात दुर्गम तीर्थक्षेत्र आहे आणि मंगळवारी भक्तांसाठी त्याचे दरवाजे पुन्हा उघडले आहे
Paytm हे भारतातील पेमेंट सुपर अॅप आहे जे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना सर्वात व्यापक पेमेंट सेवा देते. भारतातील मोबाइल QR पेमेंट क्रांतीचे प्रणेते आहेत. पेटीएमचे ध्येय हे तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील वित्तीय सेवांद्वारे अर्धा अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)