Urmila Matondkar | (Photo Credits: Facebook)

Urmila Matondkar On Badaun Gang Rape Case: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बदायूं (Badaun ) येथे दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. आरोपींनी 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Badaun Gang Rape Case) केला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात रॉड घातला. तिच्या शरीराचे लचके तोडले. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला. पीडिता ही अंगणवाडी शिक्षीका होती. पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातून आणखीही काही धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. या प्रकरणानंतर देशभरातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. अभिनेत्री आणि नुकत्याच शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

अत्यंत भयावह आणि क्रूर घटना. उत्तर प्रदेश राज्यात घडलेल्या घटनेपेक्षा आणखी वाईट काय असू शकते. महिलांबाबत होणारे गुन्हे आणि घटना याला पाटीशी का घातले जाते. हे गुन्हे लपवले का जातात? असा सवाल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. (हेही वाचा, UP Rape Shocker: पन्नास वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगासह शरीरावर असंख्य जखमा; अवयव तुटल्याचाही शवविच्छेदन अहवालात खुलासा)

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील बदायू येथील एका अंगणवाडी सहायिकेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड घातला. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात पुढे आलेली धक्कादायक बाब अशी की, पीडितेचा पाय आणि डाव्या बाजूच्या बरगडीचे हाड तुटले होते. तसेच, तिच्या फुफ्फुसालाही मोठी जखम झाली होती. पीडितेवर काही वजनदार वस्तूने प्रहार केल्याचे पुढे आले आहे. तसेच, पीडितेच्या गुप्तांग आणि शरीरावर असंख्य जखमाही पाहायला मिळाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. पीडितेचा मृत्यू धक्का आणि अतिरक्तस्त्रावामुळे झाल्याचेही पुढे आले आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी महंत याच्यासह त्याचा एक शिष्य आणि वाहनचालकावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आरोपी अद्यापही फरार आहेत.