Baba Ramdev (Photo Credit-Facebook)

चीनमध्ये हाहाकार घातल्यानंतर आता कोरोना व्हायरस (Coronavirus) इतर देशातही पसरला आहे. हा जीवघेणा कोरोना व्हायरस (Covid-19) भारतात देखील दाखल झाला आहे. उत्तर प्रदेश, जयपूर, तेलंगना, केरळ यांच्या सह अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या घातक आजाराशी सामना करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असताना आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी खास सल्ला दिला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे. तसंच कोरोना व्हायरस कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींच्या हृदयावर आणि सर्कुलेशन सिस्टमवर परीणाम करत असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. मात्र इम्युनिटी सिस्टम मजबूत असल्यास कोरोनापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता असेही ते म्हणाले. (देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर पोहचली- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन)

विशेष म्हणजे जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी काही उपायही सुचवले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम हे तीन प्राणायाम जरुर करा. पहिला भस्त्रिका प्राणायाम दोन-तीन मिनिटे, दुसरा कपालभाती पाच-दहा मिनिटे तर तिसरा अनुलोम विलोम प्राणायाम नियमित करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. याशिवाय त्यांनी सांगितले की, गिलोय नावाचे औषध भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. या गिलोय औषधाची काडी, काळीमिळी आणि तुळस यांचा काढा करुन प्यायल्याने नक्कीच फायदा होईल. या काढ्यामुळे ताप नियंत्रणात राहतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पहा व्हिडिओ:

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरस आता जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व देशातून प्रयत्न केले जात आहेत. भारतात कोरोनाचे 28 रुग्ण आढल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. तर कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह अनेक नेत्यांनी यंदाचे होळी सेलिब्रेशन रद्द केले आहे.