Ayush Visa: परदेशी नागरिकांना भारतात आता प्राचीन आयुर्वेदिक उपचार, योगाभ्यास शिकण्यासाठी मिळणार 'आयुष व्हिसा'
Visa | Twitter

Ministry of Home Affairs कडून आता "Ayush Visa" हा नवा व्हिसा जारी करण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना भारतामध्ये वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी येण्याकरिता 'आयुष व्हिसा' जारी करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय उपचार, वेलनेस आणि योगा अभ्यास करण्याचा समावेश असणार आहे. यामुळे भारतामध्ये मेडिकल टुरिझम वाढण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आयुष वीजा अंतर्गत परदेशी नागरिकांना केवळ त्याच परिस्थितीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे ज्यात ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करणार आहे. सोबतच या व्हिसावर ते योगाभ्यास शिकण्यासाठी भारतात येऊ शकतात. भारतातील आयुर्वेद या जुन्या प्राचीन चिकित्सेचा परदेशात प्रसार करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमधील एक म्हणजे आयुष वीजा आहे. नक्की वाचा: Ayurveda Centers: 1 मेपासून देशातील 37 हॉस्पिटलमध्ये सुरु होणार आयुर्वेद सेंटर; महाराष्ट्रातील 'या' ठिकाणचा समावेश .

पहा ट्वीट

आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय जगात भारतातील मेडिकल टूरिझम प्रसिद्ध करण्याच्या विशेष प्रयत्नामध्ये आहे. त्यासाठी मंत्रालयाने वन स्टॉप हील इन इंडिया विकसित केले आहे. वर्ष 2025 पर्यंत आयुष आधारित हेल्थ केयर आणि वेलफेयर इकोनॉमी 70 बिलियन डॉलर वर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतामध्ये खास मेडिकल टुरिझम अंतर्गत आयुर्वेद आणि पारंपारिक चिकित्सा पद्धतीची सकारात्मकता प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन विकास निगम पूर्णपणे प्रयत्न करत आहे. विशेष बाब म्हणजे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन विकास महामंडळही भारतात वैद्यकीय पर्यटनांतर्गत आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच दोन्ही मंत्रालयांनी यासाठी करारही केला आहे.

परदेशी नागरिकांना भारतामध्ये येऊन प्राचीन वैद्यकीय उपचार घेता यावेत यासाठी GAIIS मध्ये एका नव्या व्हिसा कॅटेगरीची घोषणा केली होती. एप्रिल 2022 मध्ये केलेली घोषणा आता मूर्त स्वरूपामध्ये येत आहे. याकरिता  व्हिसा मॅन्युअलच्या चॅप्टर 11 मधील मेडिकल व्हिसा अंतर्गत आयुष वीजा ची निर्मिती करण्यात आली आहे. आयुष व्हिसा हा चॅप्टर 11 ए असा जोडण्यात आला आहे. याकरिता व्हिसा मॅन्युअल 2019 मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचं नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे.