5 एकर जागा मुस्लिमांना दिली जाणार आहे. ही जागा अयोद्धेमध्ये दिली जाणार तर वादग्रस्त जागा रामलल्लांची आहे. यासाठी सरकारला एक ट्रस्ट स्थापन करून माहिती कोर्टासमोर सादर करण्याची आहे.  

अलाहाबाद कोर्टाकडून वादग्रस्त जमिनीचं त्रिभाजन चूकीचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुन्नी वफ्फ बोर्डाला पर्यायी जागा देणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. अशी टीप्पणी करण्यात आली आहे. आस्थेच्या नावावर तीन भाग करणं चूकीचं आहे. 

इंग्रजांमुळे हिंदू-मुस्लिम वाद; सुन्नी वफ्फ बोर्डाच्या दाव्यावर सुनावणी सुरू  झाली आहे. 1856-57 साली नमाज पठणाचे पुरावे नाहीत. 56 पूर्वी हिंदूंकडून पूजा करण्यात येत असे मात्र नंतर इंग्रजांनी रेलिंग घातल्यानंतर हिंदू- मुस्लीम यांनी दोन जागांवर प्रार्थना केल्या.  

राम चबुतरा, सीतेची रसोई यांचं अस्तित्व मान्य करण्यात आलं आहे. रामलल्लांचा पुराणातील ग्रंथांमध्ये  उल्लेख असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

बाबरी मशीद रिकाम्या जागी बांधली गेलेली नव्हती अशी ASI रिपोर्टची माहिती असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. बाबरी मशीदीखाली मोठी संरचना होती.  त्यामधील शिल्प इस्लामिक धर्माच्या नव्हत्या.  अशी माहिती देण्यात आली आहे. 

निर्मोही  आखाड्याचाही दावा फेटाळून रामलल्लाला पक्षकार मानलं आहे. यापूर्वी शिय्या वफ्फ बोर्डाचा दावा फेटाळला होता. 

अयोध्या प्रकरणी निकाल वाचनाला सुरूवात झाली असून पाच न्यायमूर्तीच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. यामध्ये शिय्या वफ्फ बोर्डाचा दावा फेटाळला 

सरन्यायाधीश रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून थोड्याच वेळात न्यायालयाच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. यामध्ये 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ निर्णय देणार आहे. 10.30 वाजल्यापासून निर्णय वाचायला सुरूवात होणार आहे.

अयोध्या निकालानंतर दुपारी 1 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. या प्रकरणी मोहन भागवत काय बोलणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.    

नितीन गडकरी यांचं जनतेला शांतता राखण्याचं आवाहन; न्याय  व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आज 10.30 च्या सुमारास सर्वोच्च न्यायालय  अंतिम फैसला वाचण्यास सुरूवात करणार आहे.

Ayodhya Case Verdict: ब्रिटीश कालापासून सुरू असलेल्या वादग्रस्त राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास या निकालाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे. अयोद्धा प्रकारणी देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईत सध्या सुमारे 50 हजार पोलिस, पॅरामिलिटरीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करा, त्याकडे जय पराजय म्हणून पाहू नका; पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना अवाहन

शुक्रवारी रात्री उशिरा अयोद्धा प्रकरणी निकाल जाहीर होणार हे समजल्यानंतर देशभरातील मान्यवरांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या निकालाचा मान राखा अशा प्रकारचे ट्वीट करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अयोद्धा निकाल प्रकरणी युपी, जम्मू कश्मीर मध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असेही सांगण्यात आले आहे.