PM Narendra Modi | | (Photo Credits: File Photo)

Ayodhya Land Dispute Verdict: सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) अयोध्या जमीन वाद प्रकरणाचा निकाल उद्या (शनिवार, 9 नोव्हेंबर 2019) देणार आहे. अतिशय संवेदनशील विषयावर आधारीत असलेल्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना शांतता आणि सलोखा राखण्याचे अवाहन केले आहे. देशवासीयांना  करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही आला तरी, त्याचा स्वीकार करा. त्याकडे जय किंवा पराजय म्हणून पाहू नका.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले आहे की, माझे देशवासीयांना अवाहन आहे की, आपण देशाची महान परंपरा आणखी मजबूत केली पाहिजे. त्यासाठी शांतता, ऐक्य, सद्भावना आदींना आपण प्राधान्य दिले पाहिजे. (हेही वाचा, Ayodhya Land Dispute Case: सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणी उद्या देणार ऐतिसासिक निकाल)

एएनआय ट्विट

काय आहे प्रकरण?

६ डिसेंबर १९९२मध्ये आयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर या प्रकरणा दिवानी आणि फौजदारी न्यायालयात अनेक खटले दाखल झाले. त्यातील भूहक्काबाबतचा वाद तर, न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१०ला या वादप्रकरणात निर्णय दिला होता. यात तीनही पक्षकारांना वादग्रस्त जमीनीचे वाटप समान विभागून देण्यात यावेत असा निर्णय देण्यात आला होता. मात्र, यावर समाधान न झाल्याने ९ मे २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. सध्या हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याचाच निकाल उद्या म्हणजेच शनिवार 8 नोव्हेंबर या दिवशी दिला जाणार आहे.