राम जन्मभूमि ट्रस्टच्या नावाची बनावट बेवसाइट, लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या 5 जणांना अटक
Arrested

उत्तर प्रदेशातील (UP) गौतम बुद्ध नगर सायबर सेलकडून राम जन्मभूमिची बनावट वेबसाइट तयार करुन नागरिकांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक केली असून त्यांनी लोकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचा खुलासा झाला आहे की, हे सर्व आरोपी दिल्लीत राहणारे आहेत. यामधील काहीजण हे सॉफ्टवेअरच्या बिझनेस मधील आहेत.(Amarnath Yatra 2021 Cancelled: कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांना 28 जूनपासून घेता येणार ऑनलाइन दर्शन)

नोएडा पोलिसांनी असे म्हटले की, दिल्लीतील न्यू अशोक नगर मध्ये राहणारा आशीष, नवीन, सुमित, अमित झा आणि सूरज यांनी मिळून काही महिन्यांपूर्वी एक वेबसाइट तयार केली. या लोकांनी बनावट बेसटाइट तयार करुन बनावटच बँक खात्यांची माहिती देत सामान्य नागरिकांना मंदिरासाठी दान करण्यासाठी अपील केले. यावर शेकडो लोकांनी ऑनलाईन ट्रान्जेक्शनच्या माध्यमातून वेबसाइटवर दिलेल्या खात्याच्या डिटेल्सवर पैसे ट्रान्सफर केले.पोलिसांनी ही माहिती मिळवली आहे की, या वेबसाइटच्या माध्यमातून आरोपींनी किती रुपये जमा केले आहेत.(Social Media Fraud: फेसबुकवर मैत्री केल्यानंतर महिलेला घातला 2.5 कोटी रुपयांचा गंडा) 

अयोध्या स्थित वास्तविक राम जन्मभूमि ट्रस्ट संबंधित लोकांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी सायबर सेलला मिळाली. यावर टीमकडून तपास करण्यात आला आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, दोन सिम कार्ड, 50 आधार कार्ड आणि दोन थंब इंप्रेशन मशीन जप्त केले आहेत. पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी केली जात असून आणखी कोणी यामध्ये सामील आहे का याचा सुद्धा तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, यामध्ये आणखी काही लोकांचा सुद्धा हात असू शकतो.