Amarnath Yatra 2021 Cancelled: कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांना 28 जूनपासून घेता येणार ऑनलाइन दर्शन
Amarnath Yatra 2021 Cancelled (Photo Credit: Twitter)

देशात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात सरकार यश आल्याचे चिन्ह दिसत आहेत. मात्र, देशात कोरोनाची तिसरी येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. तसेच नागरिकांसह अनेक संस्थाकडून देखील सरकारला सहकार्य मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर यावर्षीही अमरनाथ यात्रा रद्द (Amarnath Yatra 2021 Cancelled) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, भाविकांना 28 जूनपासून ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपालांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी ट्वीट केले की, 'कोरोना संकटामुळे श्री अमरनाथजींची यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या सदस्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रवास केवळ प्रतीकात्मक असेल. तथापि, सर्व धार्मिक विधी अमरनाथ गुहेत आयोजित केल्या जातील, जी परंपरा आहे. लोकांचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे, असे राज्यपाल म्हणाले. त्यामुळे लोकांच्या हिताच्या दृष्टीने यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा- कर्नाटक सरकारकडून कोविड19 निर्बंधासंबंधित येत्या 5 जुलै पर्यंत नव्या गाईडलाइन्स जाहीर

ट्वीट-

दरवर्षी जून महिन्यात या ठिकाणी अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येते. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. परंतु, जगभरात कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे खबदारीचा उपाय म्हणून ही यात्रा यावर्षीही रद्द करण्यात आली आहे. परंतु, भाविकांसाठी बोर्डाने सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण आणि व्हर्च्युअल दर्शन देण्याचा निर्णय घेता येणार आहे.