Representational Image (Photo: Twitter)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्या (Ayodhya) नगरीचे नाव यावेळेस एका धक्कादायक घटनेने समोर आले आहे. एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल्याने चक्क देशी दारूपासून बनवलेल्या बॉम्बने पत्नीचे घर उडवून दिल्याची ही घटना शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी घडल्याचे समजत आहे. वैवाहिक भांडणामुळे वेगवेगळे राहत असतानापत्नीचे आपलय एका मित्रासोबत सूट जुळले होते काल ही महिला आणि तिचा प्रियकर महिलेच्या घरी आले असता त्याच वेळी महिलेचा पती सुद्धा त्या ठिकाणी पोहचला अचानक पाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत विचित्र अवस्थत पाहिल्यावर या पतीच्या रागाचा पारा इतका चढला की त्याने चक्क बॉम्ब बनवून तिच्या घरावर फोडून आपला बदला घेण्याइतपत मोठे पाऊल उचलले. या हल्ल्यात महिला आणि तिचा प्रियकर गंभीर जखमी झाला असून आता त्यांच्यावर स्थानिक इस्पितळात उपचार सुरु आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अयोध्याच्या काशिराम कॉलनीत स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. पतीने खोलीमध्ये स्वतःच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट घरावर बॉम्ब फेकल्याचं समोर येत आहे. महिला तिच्या पतीपासून विभक्त राहत होती, याचा त्याला खूप राग आला होता. यापूर्वी त्याने अनेकदा पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवार तो तिच्या घरी गेला असता त्याने खोलीमध्ये पत्नीला आणि तिच्या मित्राला पाहिलं. यानंतर त्याचा पारा चढला आणि त्याने बॉम्ब हल्ला करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.  पत्नीचे डोके कापून पोलिसांकडे घेऊन गेला माथेफिरू; चौकशी करताच म्हणू लागला राष्ट्रगीत, वाचा सविस्तर

दरम्यान, या बॉम्ब हल्ल्यामध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर गंभीर जखमी झाले आहे पण त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तर या संपूर्ण प्रकरणात आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.