श्रद्धेची नगरी असलेल्या अयोध्येत इतिहास रचला गेला आहे. शनिवारी, 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Maharishi Valmiki International Airport, Ayodhya Dham) उद्घाटन केले. त्यानंतर अयोध्या धामसाठी इंडिगोचे पहिले विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. या उड्डाणाची कमान अनुभवी पायलट कॅप्टन आशुतोष शेखर (Captain Ashutosh Shekhar) यांनी घेतली होती. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी कॅप्टन शेखर यांनी प्रवाशांचे मनापासून स्वागत केले आणि या ऐतिहासिक क्षणाचा एक भाग असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या विशेष विमानाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठीही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. विमानातील प्रवाशांमध्ये मोठा उत्साह होता. अनेक प्रवाशांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. काही प्रवाशांनी जय श्री रामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)