सर्वोच्च न्यायालय (Photo Credits: PTI/File Image)

अयोध्या (Ayodhya) राम जन्मभूमी प्रकरणी आज (10 मे) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. तसेच नमून दिलेल्या मध्यस्थी समितीचे (Mediation Committee) अध्यक्ष न्यायमूर्ती एम.एफ.आय. खलीफुल्ली हे कोर्टात समितीचा अहवाल सादर करणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह अन्य चार न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी करण्यात येणार आहे.

8 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची मध्यस्थी समिती नेमली होती. या समितीत अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि जेष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू यांचा सहभाग आहे. तसेच 8 आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी पूर्ण करण्यात यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे. त्याचसोबत अयोध्या प्रकरणातील कोणताही माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये अशी तंबी समितीला दिली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत काय फैसला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(अयोद्धेमध्ये साधू संत राम मंदीरासाठी 21 फेब्रुवारीला रचणार पहिली वीट, प्रयागराज येथे शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर)

मात्र समिती नेमल्यानंतर हिंदू समाज पार्टीच्या वकिलांनी यासाठी विरोध केला होता. तसेच निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकार मध्यस्थीच्या चर्चेसाठी तयार झाले होते. परंतु त्यावेळी कोर्टात सुनावणीदरम्यान बऱ्याच गोष्टी समोर आल्या. म्हणून अयोध्या प्रकरण हे समोपचाराने सोडवावे यावर सुप्रीम कोर्टाकडून भर दिला जात होता.