केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union FM Nirmala Sitharaman) यांनी आज सलग चौथ्या पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजच्या (20 Lakh Crores Package) वाटपाविषयी माहिती दिली. भारताला सक्षम बनवण्यासाठी येत्या काळात काही क्षेत्रांना बळ देण्याची गरज आहे. त्यांना आर्थिक पाठबळ देऊन रोजगार निर्माण व्हावा यासाठी काय करता येईल यासंदर्भात आज महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ क्षेत्रात गुंतवणूक करून त्याला चालना देण्याचे काम करण्यात येणार आहे. या आठ क्षेत्रात निधी आणि गुंतवणूक स्वीकारण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात एक वेगळी टीम तयार करण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले आहे. ही आठ क्षेत्र कोणती हे थोडक्यात जाणून घ्या..नरेंद्र मोदी सरकारची 6 वर्षे पूर्ण; भाजपने शेअर केला या काळातील 'या' कामांचा लेखाजोगा मांडणारा खास Video
भारत सरकार 'या' आठ क्षेत्रात करणार नवीन गुंतवणूक
- कोळसा व्यवसाय
- खनिजे व्यवसाय
- संरक्षण संसाधनांची निर्मिती
- एअरस्पेस मॅनेजमेंट
- MRO (देखभाल, दुरुस्ती आणि जतन)
- अवकाश संशोधन क्षेत्र (Space Research)
-अणु ऊर्जा
ANI ट्विट
We are going to focus on 8 sectors today - Coal, Minerals
Defence Production, Airspace management, MROs
Power distribution companies, Space sectors, Atomic energy: Finance Minister Nirmala Sitharaman #EconomicPackage pic.twitter.com/9ywGqfc8gQ
— ANI (@ANI) May 16, 2020
दरम्यान, या आठ क्षेत्रात देशांतर्गत व देशाबाहेरून गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या क्षेत्रांचा विकास करून नोकऱ्या निर्माण करणे हा हेतू असणार आहे. या क्षेत्रात प्रगती झाल्यास अन्य देशावर या उत्पादनांसाठी अवलंबून राहावे लागणार नाही अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केली आहे.