Assembly Election 2022: नागरिकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यास 22 जानेवारीपर्यंत परवानगी नाही, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
| (Photo courtesy: archived, edited images)

Assembly Election 2022: विधानसभा निवडणूकीसाठी नागरिकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यास आयोगाकडून येत्या 22 जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आज निवडणूक आयोगाकडून एका बैठकीत रॅलीवर बंदी घालण्यासंबंधित चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर केला. त्याचसोबत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आणि सध्याच्या परिस्थितीवर सुद्धा नजर ठेवली जात आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा करत 15 जानेवारी पर्यंत रॅल आणि रोड शो सााठी परवानगी नाकारली होती.

बैठकीत सहभागी झालेल्या जवळजवळ सर्वांनी रॅलीवरील बंदीसाठी पाठिंबा दिला.सध्या रॅलीवरील बंदी एका आठवड्यासाठी वाढवण्यात आली आहे. बैठकीत समाजवादी पार्टीच्या कार्यालयात गर्दी झाल्याच्या मुद्द्यावर सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिक माहिती मिळवली आहे. दरम्यान लहान आणि इनडोर रॅलीसंबंधित निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. या रॅलीत एकत्रित लोक येण्याची संख्या 300 ठेवण्यात आली आहे.(UP Election 2022: समाजवादी पक्षाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप)

Tweet:

निवडणूकीच्या घोषणेवेळी आयोगाने म्हटले होते की, 15 जानेवारी पूर्वी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यास त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. आता आयोगाकडून रॅली संबंधित स्पष्ट केले आहे.