Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

गणेशोत्सवामुळे लांबणीवर पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election)  तारखा येत्या 2-3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र (Maharashtra), हरयाणा (Haryana) आणि झारखंड (Jharkhand) या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असून प्रथम महाराष्ट्र आणि नंतर हरयाणा आणि त्यानंतर झारखंडमध्ये या निवडणुका होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांत मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 2014 मध्ये या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निकाल 19 ऑक्टोबर रोजी लागले होते. 23 ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. 2014 मध्ये नक्षलग्रस्त झारखंडच्या निवडणुका 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान 5 टप्प्यांत झाल्या होत्या.

हेही वाचा- Maharashtra Legislative Assembly Election 2019: राज्यात 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली शक्यता

महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या निवडणूकांची रुपरेषा अंति टप्प्यात असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची दोन्ही राज्यांच्या गृह विभागांशी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी चर्चा करुन लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असे सांगण्यात येत आहे.