Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

असम विधानसभा निवडणूक 2021 (Assam Assembly Election 2021) प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवला. ''मी असममध्ये आपल्याशी खोटं बोलायला आलो नाही. जर तुम्हाला खोटं ऐकायचंच असेल तर तुम्ही तुमचा टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदी यांचे तोंड पाहा. दिसातील 24 तास ते खोटंच बोलत असतात'' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी हल्ला चढवला आहे. असममध्ये एका प्रचार सभेत ते बोलत होते. असममध्ये विधनासभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्पयासाठी अनुक्रमे 1 आणि 6 एप्रिल या दिवशी मतदान पार पडत आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आले.

काय म्हणाले राहुल गांधी?

'मी असममध्ये आपल्याशी खोटं बोलायला आलो नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. नरेंद्र मोदी नाही. जर तुम्हाला खोटं ऐकायचंच असेल तर तुम्ही तुमचा टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदी यांचे तोंड पाहा. दिसातील 24 तास ते खोटंच बोलत असतात'. पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की काँग्रेस हा दिलेली अश्वासने पूर्ण करणारा आणि पाळणार पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे तसे नाही. भारतीय जनत पक्ष रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही. त्याऐवजी असम राज्यावर आक्रमण करण्या प्राधान्य देतो. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) हा सुद्धा असम राज्यावरील आक्रमनच असल्याचे राहुल गांधी यांनी या वेळी सांगितले.

सीएए कायद्यावरुन भाजपवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले, सीएए हा कायदा म्हणजे केवळ एक कायदा नव्हे. त्याचे स्वरुप पाहता तो असम राज्याचा इतिहास, असमची भाषा आणि बंधुत्वावरचा हल्ला आहे. नागरिकांवर आक्रमण करणाऱ्या कायद्याला आमचा विरोध आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. (हेही वाचा, Rahul Gandhi Teaches Aikido: राहुल गांधी यांनी Kerala Assembly Elections 2021 प्रचारादरम्यान विद्यार्थ्यांना शिकवले अकिडो)

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. असम राज्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांदी हे दोन्ही भाऊ-बहीण पर्यटणासाठी आले आहेत. ते इथे फोटोसेशन करतील, पुढे जाऊन असममधील चहा मळेवाले किंवा जनतेचे काय व्हायचे ते होवो म्हणून जातील, असंही अमित शाह या वेळी म्हणाले.