Assam Assembly Election 2021 Exit Polls Results: असम विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स अंदाज; भाजपची सत्तेत पुनरागमनाची शक्यता
Assembly Election 2021 Exit Poll Result | (File Image)

असम विधानसभा निवडणूक 2021 (Assam Assembly Election 2021) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 2 मे 2021 या दिवशी पार पडत आहे. सर्वांच्या नजरा 2 मे या दिवशी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. असे असले तरी तत्पूर्वी येणाऱ्या असम विधानसभा निवडणूक 2021 एक्झिट पोल्स (Assam Assembly Election Exit Poll 2021)अंदाजाबाबतही मोठी उत्सुकता आहे. ही उत्सुकता आज (29 एप्रिल) संपत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा आजचा शेवटचा टप्पा आहे. आज सायंकाळी मतदान थांबताच हे एक्झिट पोल्स (Exit Poll 2021) जाहीर होणार आहेत. हे एक्झिट पोल्स हे निवडणुकीचे निकाल जरी नसले तरी असमच्या राजकारणात काय घडू शकते. कोणत्या पक्षाची सत्ता येऊ शकते याचा अंदाज येण्याासठी हे एक्झिट पोल्स ( (Exit Poll) बऱ्यापैकी मदत करु शकतात.

असम विधानसभा निवडणुकीसाठी एकूण तिन टप्प्यांत मतदान झाले होते. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल आणि तिसरा टप्पा 6 एप्रिल रोजी पार पडला होता. एकूण 126 जागांसाठी या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मुख्यमंत्री सर्बानंद सोनेवाल यांच्या समोर सत्ता भाजपच्या रुपात कायम ठेवण्याचे आव्हान आहे. असममध्ये सत्ताधारी असलेल्या भाजप समोर 8 पक्षांचे तगडे आव्हान आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि एआययूडीएफ यांचा समावेश आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असम गण परिषद आणि यूपीपीएल राज्यात आघाडी करुन निवडणूक लढत आहेत. भाजप 92 जागांवर तर भाजपचा मित्रपक्ष असम गण परिषद 26 आणि यूपीपीएल 8 जागांवर निवडणूक लढत आहे. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021 Exit Polls Results: पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदींचा TMC सत्ता राखणार; एक्झिट पोलचा अंदाज)

एक्झिट पोल्स निकाल

1)  टीवी9 भारतवर्ष

NDA – 41.7

UPA – 45.4

इतर– 12.9 %

2)  न्यूज 24- चाणक्य (News24- Chanakya Poll)

भाजप- 70 (+9)

काँग्रेस- 56 (+9)

इतर 00 (+03)

3)आज तक एक्झिट पोल्स अंदाज

भाजप आणि मंत्रिपक्षांना 75 से 85 जागा मिळण्याची शक्यता

बीजेपीः 61-65 जागा

एजीपीः 9-13 जागा

यूपीपीएलः 5-7 जागा

कांग्रेस आणि मित्रपक्षांना 40 से 50 जागा मिळण्याची शक्यता

कांग्रेसः 24-30 जागा

एआईयूडीएफः 13-16 जागा

बीपीएफः 3-4 जागा

इतर - 1 ते 4 जागा

पश्चिम बंगाल केरळ, तामिळनाडू, असम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2021 मतदानाची मतमोजणी 2 मे 2021 या दिवशी होणार आहे. तर वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकांचा आज (29 एप्रिल 2021) शेवटचा टप्पा आहे. या पाचपैकी असम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांत एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात मतदान पार पडले. आजचा 8 वा म्हणजेच अंतिम टप्पा आहे. आज मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्था सायंकाळी 6 वाजनेच्या दरम्यान Exit Polls Results जाहीर करणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार मतमोजणी 2 मे या दिवशी पार पडणार आहे.