दिल्ली विधानसभा निवडणुकीतील (Delhi Vidhansabha Elections 2020) दणदणीत विजयाने आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांचा दिल्ली मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ANI या वृत्त संस्थेच्या माहितीनुसार येत्या रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील रामलीला मैदानात (Ramlila Maidan) मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी आप कडून जोरदार तयारीची सुरुवात करण्यात आली आहे, यासोबतच केजरीवाल यांची कॅबिनेट मंत्रिमंडळ सुद्धा याच दिवशी शपथ घेणार असलयाचे समजतेय. 'आप' च्या विजयासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; शरद पवार, ममता बॅनर्जी, गौतम गंभीर, सचिन पायलट यांच्यासहित सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले अभिनंदन, पहा ट्विट
यंदाच्या निवडणुकीतील विजयासोबतच केजरीवाल यांची दिल्लीत हॅट्रिक झाली आहे. यापूर्वी 2013 , 2015 च्या दिल्ली विधानसभा निडवणुकीत केजरीवाल यांना दिल्ली वासियांची साथ मिळाली होती त्यासोबतच यंदाच्या निडवणुकीत सुद्धा 70 पैकी 62 जागी विजय प्रपात करून केजरीवाल यांनाच पुन्हा दिल्लीमध्ये निवडून देण्यात आले आहे.
ANI ट्विट
Aam Aadmi Party (AAP) chief Arvind Kejriwal to take oath as the Chief Minister of Delhi on 16th February, at Ramlila Maidan. pic.twitter.com/gABczDBoCw
— ANI (@ANI) February 12, 2020
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल हा पूर्णतः आपच्या दिशेने झुकणारा लागला होता. दिल्लीच्या 70 विधानसभा जागांपैकी 62 जागांवर 'आप'ने विजयी पताका रोवली असून भाजपला सुद्धा मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा मिळवता आल्या आहेत. अर्थात भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी अपेक्षित यश मात्र पक्षाला मिळू शकलेले नाही. दुसरीकडे काँग्रेसला तर एकही विजय प्राप्त झालेला नाही. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या मतदानातील 53.57 टक्के मते ही आप ला तर 38.51 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली आहेत.
दरम्यान, यापूर्वीच्या निडवणुकीत दोन्ही वेळेस व्हॅलेंटाईन डे ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली होती यंदा सुद्धा हा मुहूर्त साधता येणार का अशा चर्चा होत्या मात्र आता 16 फेब्रुवारी ही तारीख ठरली असून याच दिवशी केजरीवाल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे सांगण्यात आले आहे.