Arundhati Roy | (Photo Credits-Facebook)

Arundhati Roy Apologises: सुप्रसिद्ध लेखिका अरुंधति रॉय (Arundhati Roy) यांनी अखेर माफी (Apology) मागितली आहे. सन 2011 मध्ये त्यांनी भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. रॉय यांनी लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला होता. दरम्यान, या घटनेला तब्बल 9 वर्षे उलटून गेल्यानंतर रॉय यांनी लष्कराबाबतच्या आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. 'द प्रिंट' ला दिलेल्या एका प्रतिक्रियेमध्ये बोलताना अरुंधति रॉय यांनी म्हटले की, 'आपण सगळेच जण आयुष्यात कधी कधी असे बोलून जातो. जे चुकीचे आणि मूर्खपणाचे असते. ही गोष्ट चिंताजनक आहे. माझ्या विधानाच्या कोणत्याही भागातून जर कोणाच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल, तर मी त्याबद्दल माफी मागते.'

काय म्हणाल्या होत्या अरुंधति रॉय?

अरुंधति रॉय यांनी 2011 मध्ये वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले होते की, 'कश्मीर, मणिपुर, मिजोरम आणि नगालैंड यांसारख्या राज्यांमध्ये आम्ही युद्ध खेळत आहोत. 1974 पासूनच आम्ही कश्मीर, तेलंगाना, गोवा, पंजाब, मणिपुर, नगालैंड याराज्यांमध्ये लढतो आहोत. भारत एक असा देश आहे जो आपले लष्कर आपल्याच लोकांविरुद्ध उभे करतो. पाकिस्ताननेही आपल्या लष्कराला अशा पद्धतीने उभे केले नाही.' पुढे बोलताना अरुंधति यांनी म्हटले होते की, 'पूर्वेकडील आदिवासी, कश्मीर मधील मुसलमान, पंजाबमधील शिख आणि गोव्यातील ईसाई यांच्यासोबत भारत देश लढत आहे. असे वाटते की, हा एक उच्चवर्णीय भारतीयांचाच देश आहे.'

अरुंधति रॉय यांच्या या विधानावरुन सोशल मीडियावर गेले काही दिवस जोरदार टीका केली जात होती. सोशल मीडिया युजर्स रॉय यांना 1971 मध्ये पाकिस्तान लष्कारकडून बांग्ला भाषकांचा करण्यात आलेल्या नरसंहाराची आठवण करुन दिली जात होती. सोशल मीडियावर सातत्याने होणारी टीका पाहून अरुंधति रॉय यांनी आपल्या विधानाबबत माफी मागितली आहे. (हेही वाचा, Ramon Magsaysay Award 2019: पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार; पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव)

शमा मोहम्मद ट्विट

दरम्यान, माफी मागताना अरुंधति रॉय यांनी म्हटले आहे की, 'माझ्या लिखाणातून स्पष्ट होते की, मी पाकिस्तानबद्दल काय विचार करते. इतकेच नवहे तर, त्यांनी आपल्या वक्तव्यात बलूचिस्तान येथील नरसंहार आणि आजच्या बांग्लादेशबद्दल पाकिस्तानने केलेल्या अत्याचाराचाही उल्लेख केला आहे.'

'द प्रिंट'शी बोलताना अरुंधति रॉय पुढे म्हणाल्या, 'कश्मीर मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाईट स्थितीत पोहोचला आहे. सोशल मीडियावर 9 वर्षे जुनी एक व्हिडिओ क्लिप शेअर केली जात आहे. यात भारत सरकार आपल्या देशांतील लोकांविरुद्धच आपले सैनिक उभे करत असल्याचे विधान करताना मी दिसते आहे. तसेच, पाकिस्तानदेखील आपल्या नागरिकांसोबत असे सैन्यचा असा वापर करत नसल्याचे बोलतानाही मी दिसते.'

दरम्यान, अरुंधति रॉय यांनी कधी कधी आपण मूर्खासारखे विधान करतो. क्लिपमध्ये मी बोलताना दिसत असलेले वक्तव्य हे माझ्या पूर्ण विचारांना प्रकट करत नाही. माझे विचार माझ्या लिखाणातून व्यक्त झालेले आहे. जे मी अनेक वर्षांपासून लिहिले आहे. मी एक लेखिका आहे आणि मी असे मानते की, आपण बोललेले शब्द हे आपल्या विचारांपेक्षाही अधिक महत्त्वाचे असतात. या क्लिमधील विधानामुळे लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारे झालेल्या गोंधळाबद्दल मी माफी मागते.